शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातील अतिवृष्टीबाधितांना राज्य शासनाची अखेर १९ कोटी ३८ लाखांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 02:25 IST

ठाण्याचा वाटा सव्वाअकरा कोटींचा ; छोटे व्यापारी, टपरीधारकांना लाभ

नारायण जाधव ठाणे : राज्यात जुलै ते ऑक्टोबर झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांसह अनेक शहरे, गावांतील छोटे व्यापारी, हस्तकला कारागिर, टपरीधारकांसह बारा बलुतेदारांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय शेतकऱ्यांचे पशुधनासह गोठ्यांचेही मोठे नुकसान झाले होते. यात कोकणातील ठाणे, पालघरसह रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांतही मोठी हानी झालेली आहे. यानुसार कोकण आयुक्तांनी केलेल्या मागणीनुसार १९ कोटी ३७ लाख ३२ हजार ३२० रुपयांची मदत महसूल व पुनर्वसन विभागाने गेल्या आठवड्यात वितरीत केली आहे. यात सर्वात मोठा हिस्सा ठाणे जिल्ह्याचा आहे.

राज्यात झालेल्या अतिवृष्टीने अनेक जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यात कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांतील अनेक गावे पुराच्या पाण्याखाली गेली होती. शहरांमध्ये अनेक घरे, चाळी, दुकानांत पाणी शिरून व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले होते. शिवाय शेतीसह शेतकºयांच्या पशुधनासह त्यांच्या गोठ्यांचीही पडझड झाली होती. त्यानंतर मंत्रिमंडळ उपसमितीच्या १९ आॅगस्ट २०१९ च्या बैठकीत छोटे उद्योग, गॅरेजचालक, हस्तकला कारागिर, टपरीधारक, घरांच्या पडझडीस गोठ्यांच्या नुकसानीकरिताही मदत देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ही १९ कोटी ३७ लाख ३२ हजार ३२० रुपयांची मदत गेल्या आठवड्यात वितरीत करण्यात आली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य शासनाकडून ही मदत करण्यात येत असल्याचे महसूल व पुनर्वसन विभागाने म्हटले आहे.

ठाणे जिल्ह्याला सर्वाधिक मदतकोकणात सर्वात जास्त नुकसान ठाणे जिल्ह्यात झाले आहे. जिल्ह्यातील सहा महापालिका,दोन नगरपालिकांच्या क्षेत्रासह ग्रामीण भागातही या काळात मोठे नुकसान झाले होते. ठाणे शहरातील दिवा विभाग,अंबरनाथ-बदलापूर शहरासह ग्रामीण परिसर, उल्हासनगर, कल्याण तालुक्यातील अनेक गावे पाण्याखाली होती. तसेच शहापूर, मुरबाड, भिवंडीतही काही भागात पुराच्या पाण्यातून काढण्यासाठी एनडीआरएफस नौदल आणि हवाईदलाची मदत घेऊन स्थानिकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने वाचविण्यात आले होते. त्यावेळी जिल्हा प्रशासनाने नजिकच्या शाळा तसेच हवाईदलाच्या तळावर त्यांची तात्पुरती सोय केली होती. तसेच ग्रामीण भागात गोठ्यांचेही मोठी पडझड झाली होती. यामुळेच ठाणे जिल्ह्याचा या मदतीत ११ कोटी २५ लाख ६८ हजार इतका मोठा वाटा मिळाला आहे.अतिवृष्टी, पुरग्रस्त भागाची पाहणीकेंद्र शासनाच्या पथकानेही दोन दिवस फिरून ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागांची पाहणी करून आणि त्या त्या जिल्हाधिकाºयांचे सादरीकरण ऐकून घेतले होते. केंद्राची मदत येण्याआधीच राज्य शासनाने ही मदत वितरीत केली आहे.जिल्हानिहाय अशी मिळणार मदतठाणे ११ कोटी २५ लाख ६८ हजारपालघर १६ हजार ८००रायगड दोन कोटी ९७ लाख ३१ हजार ७३५रत्नागिरी चार कोटी ६१ लाख चार हजार ६८५सिंधुदूर्ग ५३ लाख ११ हजार

टॅग्स :Rainपाऊस