शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

फटाक्यांच्या बंदीवरून राजकीय आतषबाजी; शिवसेना, मनसेचा विरोध : रामदास कदम यांची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 05:05 IST

सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत फटाक्यांवर बंदी आणल्यानंतर महाराष्ट्रातही अशी बंदी आणण्यावरून राजकीय आतषबाजी सुरू झाली आहे.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत फटाक्यांवर बंदी आणल्यानंतर महाराष्ट्रातही अशी बंदी आणण्यावरून राजकीय आतषबाजी सुरू झाली आहे.  प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी निवासी भागात फटाके विक्रीवर बंदी आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे वक्तव्य पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केल्यानंतर शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी फटाकेबंदीविरोधातच फटाका लावला.नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी निवासी भागात फटाके विक्रीवर मुंबई उच्च न्यायालयाने बंदी आणल्याचे वृत्त वाहिन्यांवर झळकले. मात्र त्या वृत्ताची कोणतीही खातरजमा न करता राजकीय आतषबाजीला सुरुवात झाली. मुख्यमंत्री म्हणाले, पर्यावरण विभागाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियानाची सुरुवात केली. सर्व सण-उत्सव साजरे करताना हवेचे प्रदूषण, ध्वनिप्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. निरोगी व प्रदूषणमुक्त वातावरणासाठी कुठेही पर्यावरणाचा ºहास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. तर यंदाची दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करावी, असे आवाहन करत फटाक्यांवरील बंदीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सूतोवाच पर्यावरणमंत्री कदम यांनी केले.फटाकेमुक्त दिवाळीची चर्चा सुरू होताच शिवसेनेने तीव्र आक्षेप घेतला. फटाक्यांवर कसल्याही प्रकारची बंदीसहन करणार नसल्याचा इशारा खा. संजय राऊत यांनी दिला. ते म्हणाले, असंख्य मराठी मुले फटाक्यांचे स्टॉल लावून उदरनिर्वाह करीत आहेत. शिवसेना शाखांनी त्यांना जागा उपलब्ध करून दिल्या. त्यांच्यावर पोटावर का मारता, असा सवाल राऊत यांनी केला.

टॅग्स :Crackers Banफटाके बंदीCrackersफटाकेdiwaliदिवाळीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार