शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

राज्याच्या विकासाची गाडी मेट्रोप्रमाणे धावणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 16:04 IST

जग वेगाने पुढे जात आहे. विकासाचा वेग वाढला आहे. विकासात राजकारण न करता राज्यात विकासाची कामे त्याच वेगाने करायची आहे.

ठळक मुद्देजग वेगाने पुढे जात आहे. विकासाचा वेग वाढला आहे. विकासात राजकारण न करता राज्यात विकासाची कामे त्याच वेगाने करायची आहे.विकास करताना कामाचे श्रेय घ्यायचे नाही. हे सरकार माझे नव्हे तर आपले आहे.

नागपूर : जग वेगाने पुढे जात आहे. विकासाचा वेग वाढला आहे. विकासात राजकारण न करता राज्यात विकासाची कामे त्याच वेगाने करायची आहे. विकास करताना कामाचे श्रेय घ्यायचे नाही. हे सरकार माझे नव्हे तर आपले आहे. केवळ जनतेचे आशीर्वाद आणि शुभेच्छा हव्या आहेत. राज्याच्या विकासाची गाडी मेट्रोच्या वेगाने धावणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे व्यक्त केला.महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत लोकमान्यनगर ते सीताबर्डी इंटरचेंजपर्यंतच्या ११ किमीच्या अ‍ॅक्वा लाइनचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हिडीओ लिंकद्वारे मंगळवारी सुभाषनगर स्टेशनवर करण्यात आले. व्यासपीठावर केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, ऊर्जा व नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री सुनील केदार, खा. कृपाल तुमाने, खा. डॉ. विकास महात्मे, आ. विकास ठाकरे, आ. समीर मेघे, आ. मोहन मते, आ. प्रकाश गजभिये, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय नगरविकास सचिव दुर्गाशंकर मिश्रा, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे आणि महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित उपस्थित होते. विकासासाठी एकाच स्टेशनवर एकत्र : उद्धव ठाकरेकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक करताना उद्धव ठाकरे म्हणाले, एका गाडीत एकत्र आलो नसलो तरी स्टेशनवर मात्र एकत्र आलो आहोत. एकमेकांचा हात, कामाची साथ आपण कधीही सोडणार नाही. भाषण करीत असताना त्या विषयाचा अभ्यास असावा लागतो. अभ्यासपूर्ण भाषण करणारे गडकरी यांच्यासारखे मंत्री राज्यातच नव्हे, तर देशातही दुर्मीळ आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील मुंबई-पुणे महामार्गाचे काम त्यांनी वेळेपूर्वीच पूर्ण केले. गडकरी यांनी दिलेला शब्द पाळला होता, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. मेट्रोच्या विस्तारित प्रकल्पाला त्वरित मंजुरी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे