राज्यात काेराेना रुग्ण बरे होण्याचा दर ९२.४१ टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2020 03:11 AM2020-11-15T03:11:03+5:302020-11-15T03:11:24+5:30

Corona Virus News: राज्यात शनिवारी काेराेनाच्या ४ हजार २३७ बाधितांचे निदान झाले असून १०५ मृत्यूंची नोंद झाली.

In the state, the cure rate of carina is 92.41 percent | राज्यात काेराेना रुग्ण बरे होण्याचा दर ९२.४१ टक्क्यांवर

राज्यात काेराेना रुग्ण बरे होण्याचा दर ९२.४१ टक्क्यांवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :  राज्यात शनिवारी काेराेनाचे २ हजार ७०७ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण १६ लाख १२ हजार ३१४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ९२.४१ टक्के झाला आहे. सध्या ८५ हजार ५०३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


राज्यात शनिवारी काेराेनाच्या ४ हजार २३७ बाधितांचे निदान झाले असून १०५ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या १७ लाख ४४ हजार ६९८ झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ४५ हजार ९१४ रुग्णांनी जीव गमावला आहे. राज्यातील मृत्युदर २.६३ टक्के आहे.


       राज्यात शनिवारी दिवसभरात नोंद झालेल्या एकूण १०५ मृत्यूंपैकी ५० मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत, तर १२ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ४३ मृत्यू हे एक आठवड्यापूर्वीच्या कालावधीतील आहेत.

Web Title: In the state, the cure rate of carina is 92.41 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.