शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

राज्यात मंगळवारी 52.68 टक्के काेराेना लसीकरण पूर्ण; १४ हजार ८८३ कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ; सर्वाधिक लसीकरण मुंबईत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 07:08 IST

राज्यात सर्वाधिक लसीकरण पुन्हा मुंबईत झाले असून १ हजार ५९७ लाभार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला. त्याखालोखाल ठाण्यात १ हजार ४३४ तर पुण्यात १ हजार ४०३ लाभार्थ्यांनी लसीकरण घेतले आहे. दिवसभरात हिंगोलीत सर्वांत कमी १२० लाभार्थ्यांनी लसीकरण घेतले आहे.

मुंबई : राज्यात मंगळवारी विविध केंद्रांवर आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. दिवसभरात उशिरापर्यंत १४ हजार ८८३ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. या टप्प्यात लसीकरणाचे प्रमाण ५२.६८ टक्के इतके आहे.राज्यात सर्वाधिक लसीकरण पुन्हा मुंबईत झाले असून १ हजार ५९७ लाभार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला. त्याखालोखाल ठाण्यात १ हजार ४३४ तर पुण्यात १ हजार ४०३ लाभार्थ्यांनी लसीकरण घेतले आहे. दिवसभरात हिंगोलीत सर्वांत कमी १२० लाभार्थ्यांनी लसीकरण घेतले आहे. राज्यात शनिवारी ३४ जिल्हे आणि २७ महापालिका क्षेत्रांमध्ये लसीकरणाचे सत्र सुरू झाले असून कोविन पोर्टलवर १७ हजार ७६२ व्हॅक्सिनेटर्स आणि ७ लाख ८५ हजार ९२७ आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंद करण्यात आली आहे. लस घेतल्यानंतर गंभीर प्रतिकूल परिणाम झाल्याची घटना झाली नसून उद्यादेखील लसीकरण सत्र आयोजित करण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.राज्यात १६ जानेवारीला झालेल्या लसीकरणात पहिल्या दिवशी १८ हजार ३३८ हून अधिक कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली, हे प्रमाण ६४ टक्के इतके होते. या वेळी मुंबईत सर्वाधिक लाभार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला होता, ही संख्या १ हजार ९२६ इतकी होती.मुंबई महापालिकेने दररोज चार हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र पहिल्याच दिवशी केवळ १,९२६ वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लस देणे शक्य झाले. त्यामुळे रविवार (दि. १७) आणि सोमवारी (दि. १८) असे दोन दिवस लसीकरण मोहीम स्थगित करण्यात आली होती. मंगळवारीही या मोहिमेत फारसा फरक जाणवला नाही.आठशे डुप्लिकेट नावे यादीमधून काढल्यानंतर महापालिकेने मंगळवारी ३,२०० वैद्यकीय कर्मचाऱ्यांना केंद्रांवर बोलावले होते. मात्र यापैकी १,५९७ कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली. सर्वाधिक परळ येथील केईएम रुग्णालयात ३०७ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली; तर जे. जे. रुग्णालयात सर्वांत कमी म्हणजे १३ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. दोन दिवसांत आठ हजारांऐवजी केवळ ३५२३ कर्मचाऱ्यांना लस देण्यात पालिकेला यश आले आहे.तीन कर्मचाऱ्यांना किरकाेळ त्रासमंगळवारी झालेल्या लसीकरणावेळी तीन कर्मचाऱ्यांना किरकोळ त्रास जाणवला. त्यामुळे त्यांना अर्धा तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांची प्रकृती लस दिल्यानंतरही उत्तम असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र केंद्रावर लस घेण्यासाठी कमी कर्मचारी हजेरी लावत असल्याने अद्यापही त्यांच्यात संभ्रम असल्याचे दिसून येत आहे. ॲपमधील तांत्रिक अडचण कायमलसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या वेळेही गोविंद ॲपमध्ये तांत्रिक बिघाड कायम असल्याने पालिका अधिकारी हैराण आहेत. आठशे नाव दोनवेळा आल्याचे समोर आल्यानंतर एकाच विभागातील कर्मचाऱ्यांना बोलावले जात असल्याचेही उजेडात आले. याकडे महापालिकेने राज्य सरकार लक्ष वेधले आहे.

कंसात लसीकरण झालेले कर्मचारी : अकोला (१८१), अमरावती (२३९), बुलडाणा (३५९), वाशिम (२१२), यवतमाळ (२८९), औरंगाबाद (३३५), हिंगोली (१२०), जालना (२३१), परभणी (२२९), कोल्हापूर (५४५), रत्नागिरी (२४५), सांगली (४३२), सिंधुदुर्ग (१६१), बीड (१४२), लातूर (२२१), नांदेड (२७६), उस्मानाबाद (२३८), मुंबई (५९५), मुंबई उपनगर (१००२), भंडारा (२०६), चंद्रपूर (३९९), गडचिरोली (१८७), गोंदिया (१४४), नागपूर (६५६), वर्धा (३८६), अहमदनगर (६५०), धुळे (३१३), जळगाव (३९७), नंदुरबार (२८५), नाशिक (७१०), पुणे (१,४०३), सातारा (५११), सोलापूर (६८१), पालघर (३१९), ठाणे (१,४३४), रायगड (१५०).आठशे नाव डुप्लिकेट असल्याने ३२०० कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आले. यापैकी ५० टक्के कर्मचाऱ्यांनी लस घेतली. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये लसीबाबत भीती असल्याचे बोलता येणार नाही.- डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या