शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
5
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
6
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
7
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
8
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
9
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
10
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
11
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
12
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
13
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
14
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
15
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
16
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
17
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
18
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
19
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
20
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार

कुरुंदवाडमध्ये १० डिसेंबरपासून राज्य अजिंक्यपद व्हॉलिबॉल स्पर्धा

By admin | Updated: November 25, 2014 00:08 IST

तबक उद्यानात ४६ वी महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा पुरुष व महिला व्हॉलिबॉल अजिंक्यपद स्पर्धा १० ते १४ डिसेंबरअखेर

कुरुंदवाड : येथील श्री स्पोर्टस् क्लबच्यावतीने व जिल्हा व्हॉलिबॉल असोसिएशनच्या मान्यतेने येथील तबक उद्यानात ४६ वी महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा पुरुष व महिला व्हॉलिबॉल अजिंक्यपद स्पर्धा १० ते १४ डिसेंबरअखेर होत असल्याची माहिती स्पर्धा संयोजन समिती सचिव डॉ. सुनील चव्हाण व प्रा. बी. डी. सावगावे यांनी पत्रकार बैठकीत दिली.पाच दिवस दिवस-रात्र खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत राज्यातील संपूर्ण ३८ जिल्ह्यांतील महिलांचे ३६, तर पुरुष गटातील ३८ संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये सुमारे १२०० खेळाडू, क्रीडा प्रशिक्षक, पंच व पदाधिकारी या नगरीत येत असून, त्यांच्या निवासाची व भोजनाची संपूर्ण सोेय करण्यात आली आहे.१९९२ मध्ये हुपरी (ता. हातकणंगले) येथे या स्पर्धा झाल्या होत्या. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात यजमानपद मिळविणारे कुरुंदवाड हे एकमेव शहर आहे. या स्पर्धा येथील तबक उद्यानात पाच सेटवरती दिवस-रात्र विद्युत झोतात होणार आहेत. त्यासाठी तबक उद्यानातील मैदानात बसण्याची सुसज्ज व्यवस्था केली आहे. रात्रीच्या खेळासाठी मैदानात १५० हॅलोजन लावण्यात येणार असून, स्पर्धेचे नेटके संयोजन व्हावे यासाठी श्री स्पोर्टस् क्लबचे खेळाडू गेले दोन महिने झटत आहेत. ही राज्य अजिंक्य स्पर्धा असून, या स्पर्धेतून चेन्नई येथे होणाऱ्या अखिल भारतीय व्हॉलिबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून संघ निवडला जाणार आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठी सुमारे ३५ लाख रुपये खर्च येणार असून, क्रीडा रसिक, खेळाडू, विविध संस्थांचे सहकार्य मिळत असल्याचेही सांगितले.यावेळी स्पर्धा संयोजन समिती स्वागताध्यक्ष व नगराध्यक्ष संजय खोत, क्रीडा संस्थेचे अध्यक्ष जयराम पाटील, उपाध्यक्ष रामचंद्र डांगे, उपनगराध्यक्ष सुरेश कडाळे, बांधकाम सभापती वैभव उगळे, नगरसेवक गणपतराव पोमाजे, वसंतराव पाटील, बाळासो देसाई, बाबासो सावगावे, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)