‘नॅको’च्या अनुदानाला राज्य रक्त संक्रमण परिषदेचा खोडा

By Admin | Updated: October 1, 2015 02:57 IST2015-10-01T02:57:30+5:302015-10-01T02:57:30+5:30

केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या नॅशनल एड्स कंट्रोल आॅर्गनायझेशन (नॅको) द्वारा रक्तदान करणाऱ्या ऐच्छिक रक्तदात्यांसाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे प्रतिव्यक्ती ५८.३४ रुपये दिले जातात.

State Blood Transit Council for Naco's Subsidy | ‘नॅको’च्या अनुदानाला राज्य रक्त संक्रमण परिषदेचा खोडा

‘नॅको’च्या अनुदानाला राज्य रक्त संक्रमण परिषदेचा खोडा

अकोला : केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या नॅशनल एड्स कंट्रोल आॅर्गनायझेशन (नॅको) द्वारा रक्तदान करणाऱ्या ऐच्छिक रक्तदात्यांसाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे प्रतिव्यक्ती ५८.३४ रुपये दिले जातात. मात्र राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून राज्यातील २९९ रक्तपेढ्यांना प्रतिव्यक्ती ४० रुपयांप्रमाणे अनुदान दिले जात असल्याचा प्रकार माहितीच्या अधिकारातून उघड झाला आहे.
विविध सामाजिक संघटना, संस्था रक्तदान शिबिरांचे आयोजन करतात. रक्तदात्यांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशातून रक्तदात्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व चहा-बिस्कीट देण्यासाठी केंद्र पुरस्कृत नॅशनल एड्स कंट्रोल आॅर्गनायझेशनद्वारा राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे प्रति रक्तदाता ५८.३४ रुपये याप्रमाणे अनुदान दिले जाते. राज्य रक्त संक्रमण परिषदेला या अनुदानात कपात करण्याचे अधिकार नसताना राज्यातील २९९ रक्तपेढ्यांना प्रतिरक्तदाता ४० रुपये अदा केले जातात. ‘नॅको’च्या ११ मार्च २०१४ च्या परिपत्रकानुसार ७५ रक्तदात्यांच्या एका शिबिरासाठी ४ हजार ३७५ रुपये राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे सोपवले जातात. यामध्ये इंधनासाठी एक हजार रुपये, ‘आयईसी’ साहित्यासाठी ३७५ रुपये, प्रमाणपत्र, पिन, स्मृतिचिन्हांसाठी १ हजार १२५ रुपये व प्रत्येक रक्तदात्याच्या नाश्त्यासाठीही निधीची तरतूद केली आहे. मुळात ऐच्छिक रक्तदात्यांना लहान बिस्कीटचा पुडा व एक कप चहा किंवा कॉफी दिली जाते. सिकलसेल सोसायटी आॅफ इंडियाचे अध्यक्ष संपत रामटेके यांनी माहिती अधिकारात माहिती मागितली असता, वर्ष २०१४ मध्ये राज्य रक्त संक्रमण परिषदेने राज्यातील २९९ रक्तपेढ्यांना प्रतिरक्तदाता ४० रुपये दिले. यामध्ये प्रत्येक रक्तदात्यास २५ रुपयांचा नाश्ता दिल्यानंतर उर्वरित १५ रुपये शिबिरासाठी इतर कामामध्ये खर्च झाल्याची धक्कादायक बाब उजेडात आली.

Web Title: State Blood Transit Council for Naco's Subsidy