शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

मराठी वाङ्मय निर्मितीसाठीचे राज्य पुरस्कार जाहीर

By admin | Updated: February 7, 2016 00:10 IST

महाराष्ट्र शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीसाठी सन २०१४च्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. १ लाख रुपये आणि ५० हजार रुपये अशा दोन विभागांत हे

मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीसाठी सन २०१४च्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. १ लाख रुपये आणि ५० हजार रुपये अशा दोन विभागांत हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. राज्य शासनातर्फे उत्कृष्ट साहित्य निर्मितीला प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार दिले जातात.सन २०१४ या वर्षाकरिता उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस राज्य पुरस्कार प्रदान करण्यासाठी पात्र ठरविण्यात आलेल्या लेखक/ साहित्यिकांची यादी पुढीलप्रमाणे:-प्रौढ वाङ्मय (काव्य) - कवी केशवसुत पुरस्कार : मनोहर जाधव (तीव्र एकांतातल्या जीर्ण काळोखात), १ लाख रुपये; प्रथम प्रकाशन (काव्य)- बहिणाबाई चौधरी पुरस्कार : विनायक येवले (ठसे बदललेल्या मुक्कामावरून), ५० हजार रुपये; प्रौढ वाङ्मय (नाटक/ एकांकिका)- राम गणेश गडकरी पुरस्कार : प्रा. मधू पाटील (कामस्पर्शिता पाच एकांकिका); प्रथम प्रकाशन (नाटक/ एकांकिका)- विजय तेंडुलकर पुरस्कार : शिफारस नाही; प्रौढ वाङ्मय (कादंबरी)- हरी नारायण आपटे पुरस्कार : राजन खान (रजेहो उर्फ मुद्दाम भरकटलेली कथा), १ लाख रुपये; प्रथम प्रकाशन (कादंबरी)- श्री. ना. पेंडसे पुरस्कार : व्यंकट पाटील (घात), ५० हजार रुपये; प्रौढ वाङ्मय (लघुकथा)- दिवाकर कृष्ण पुरस्कार : विनिता ऐनापुरे (कथा तिच्या), १ लाख रुपये; प्रथम प्रकाशन (लघुकथा)- ग.ल. ठोकळ पुरस्कार : मनस्विनी लता रवींद्र (ब्लॉगच्या आरशापल्याड), ५० हजार रुपये; प्रौढ वाङ्मय (ललितगद्य) (ललित विज्ञानासह) अनंत काणेकर पुरस्कार : अमृता सुभाष (एक उलट... एक सुलट), १ लाख रुपये; प्रथम प्रकाशन- (ललितगद्य)- ताराबाई शिंदे पुरस्कार : रवी अभ्यंकर (पन्नाशीचा भोज्या), ५० हजार रुपये; प्रौढ वाङ्मय (विनोद) श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर पुरस्कार : मंगला गोडबोले (ऋतू हिरवट), १ लाख रुपये; प्रौढ वाङ्मय (चरित्र)- न.चिं. केळकर पुरस्कार : प्रा. नीलकंठ पोलकर (ज्ञानसूर्य डॉ. डी.वाय. पाटील), १ लाख रुपये; प्रौढ वाङ्मय (आत्मचित्र)- लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार : म.सु. पाटील (लांबा उगवे आगरी), १ लाख रुपये; प्रौढ वाङ्मय (समीक्षा/ वाङ्मयीन संशोधन/ सौंदर्यशास्त्र/ ललितकला आस्वादपर लेखन)- श्री. के. क्षीरसागर पुरस्कार : यशोदा भागवत (ग्राफिक डिझाईनचे गारुड), १ लाख रुपये; प्रथम प्रकाशन (समीक्षा/ सौंदर्यशास्त्र)- रा.भा. पाटणकर पुरस्कार : शिफारस नाही; प्रौढ वाङ्मय (राज्यशास्त्र / समाजशास्त्र)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार : विजय नाईक (साऊथ ब्लॉक दिल्ली शिष्टाईचे अंतरंग), १ लाख रुपये; प्रौढ वाङ्मय (इतिहास)- शाहू महाराज पुरस्कार : डॉ. माया पाटील (शहापूरकर) मंदिर-शिल्पे मराठवाड्यातील काही शिल्प आणि मंदिर स्थापत्य, १ लाख रुपये; प्रौढ वाङ्मय (भाषाशास्त्र/ व्याकरण)- नरहर कुरुंदकर पुरस्कार : डॉ. सुधीर रा. देवरे (अहिराणीच्या निमित्ताने : भाषा) , १ लाख रुपये; प्रौढ वाङ्मय (विज्ञान व तंत्रज्ञान) (संगणक व इंटरनेटसह)- महात्मा जोतीराव फुले पुरस्कार : डॉ. निवास पाटील (शोध देवकणाचा), १ लाख रुपये; प्रौढ वाङ्मय (शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखनासह) वसंतराव नाईक पुरस्कार : गजेंद्र प्रभाकर बडे (योजनाची विकासगंगा भाग : १ शेतीच्या योजना), १ लाख रुपये; प्रौढ वाङ्मय (दलित साहित्य) - लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार : शिफारस नाही, १ लाख रुपये; प्रौढ वाङ्मय (अर्थशास्त्र व अर्थशास्त्राविषयक लेखन) सी.डी. देशमुख पुरस्कार : डॉ. जे.के. पवार (अर्थायन), १ लाख रुपये; प्रौढ वाङ्मय (तत्त्वज्ञान व मानसशास्त्र)- ना. गो. नांदापूरकर पुरस्कार : राजीव साने (गल्लत गफलत गहजब), १ लाख रुपये; प्रौढ वाङ्मय (शिक्षणशास्त्र)- कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार : मंगला कुलकर्णी (शिक्षणातून स्वयंपूर्णतेकडे), १ लाख रुपये; प्रौढ वाङ्मय (पर्यावरण)- डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार : संतोष शिंत्रे (विज्ञानाधारित निसर्ग संवर्धन-संरक्षण), १ लाख रुपये; प्रौढ वाङ्मय (संपादित/ आधारित)- रा.ना. चव्हाण पुरस्कार : संपा. अरुणा ढेरे (स्त्री-लिखित मराठी कथा १९५० ते २०१०); प्रौढ वाङ्मय (अनुवादित)- तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार : अनु. वर्षा गजेंद्रगडकर (दोन क्षितिजे), १ लाख रुपये; प्रौढ वाङ्मय (संकीर्ण- क्रीडासह)- भाई माधवराव बागल पुरस्कार : सुकन्या आगाशे (मागोवा मिथकांचा), १ लाख रुपये; बालवाङ्मय (कविता)- बालकवी पुरस्कार : शं.ल. नाईक (माकडोबाची वरात), ५० हजार रुपये; बालवाङ्मय (नाटक व एकांकिका)- भा.रा. भागवत पुरस्कार : शिफारस नाही, ५० हजार रुपये; बालवाङ्मय (कादंबरी)- साने गुरुजी पुरस्कार : सुरेश वांदिले (बेअर्ड काका), ५० हजार रुपये; बालवाङ्मय (कथा- छोट्या गोष्टी, परीकथा, लोककथांसह)- राजा मंगळवेढेकर पुरस्कार : भा.ल. महाबळ (चोरानं खोकला नेला!), ५० हजार रुपये; बालवाङ्मय सर्वसामान्य ज्ञान (छंद व शास्त्रे)- यदुनाथ थत्ते पुरस्कार : मंगला नारळीकर (गणित गप्पा भाग १), ५० हजार रुपये; बालवाङ्मय (संकीर्ण) ना.धो. ताम्हणकर पुरस्कार : डॉ. भगवान अंजनीकर (कुशल सारथी नरेंद्र मोदी) (प्रतिनिधी)