शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात एमबीबीएसच्या २५ टक्के जागा वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 02:22 IST

केंद्र शासानचा १० टक्क्यांचा प्रस्ताव पडला मागे : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना

सुमेध वाघमारे नागपूर : राज्यात शासकीयसह महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमबीबीएसच्या २५ टक्के जागा वाढविण्याचे प्रस्तावित असून वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना तसा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केल्या आहेत. विशेष म्हणजे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या पूर्वी १० टक्के जागा वाढविण्याचा निर्णय घेतला होता, परंतु ‘बोर्ड ऑफ गव्हर्नर’ समितीने २५ टक्के जागा वाढविण्याचा सूचना केल्याने आता यात बदल करण्यात आला आहे.

शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची असलेली कमतरता दूर करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने २०१३-१४ मध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या ५० जागा वाढविण्याचा निर्णय घेतला होता. याचा फायदा दोनशेच्या आत एमबीबीएसच्या जागा असलेल्या महाविद्यालयांना झाला. मात्र या जागेला अनुसरून अनेक ठिकाणी आवश्यक मनुष्यबळ व पायाभूत सोयी देण्यास शासन कमी पडले. परिणामी, ‘मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया’ आजही या वाढीव जागांबाबत त्रुटी काढत आहे.

दरम्यानच्या काळात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यात पुन्हा एमबीबीएसच्या १० टक्के जागा वाढविण्याचा निर्णय घेतला. सुत्रानूसार, ‘बोर्ड ऑफ गव्हर्नर’ समितीने या निर्णयात बदल केला. १० टक्क्यांवरून २५ टक्के जागा करण्याचा निर्णय घेतला. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयांतर्गत (डीएमईआर) राज्यात १९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत. महापालिकेसह, वैद्यकीय महाविद्यालयांच्या मिळून एमबीबीएसच्या साधारण ३०८० जागा आहेत. २५ टक्के जागेला मंजुरी मिळाल्यास साधारण ७७० जागा राज्यात वाढण्याची शक्यता आहे. मात्र सरकारने पायाभूत सोयी वाढविण्याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचेही तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

टॅग्स :Medicalवैद्यकीय