शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

आठवडाभरात शाळा सुरू करा, आता वेळकाढूपणा नको; पालक आणि शाळा संघटना संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 8:29 AM

शहरातील सर्व व्यवहार सुरू असताना शाळा बंद ठेवू नयेत, अशी मागणी पुन्हा एकदा पॅरेंट्स असोसिएशन ऑफ मुंबई २०२१ यांनी केली आहे.

मुंबई :  अमेरिका, कॅनडा, युरोप यांसह असंख्य देशांत संसर्ग मोठा असतानाही शाळा पालक संमतीने सुरू आहेत. शिवाय मुंबईतही अमेरिकन, जर्मन, फ्रेंच या आंतरराष्ट्रीय मंडळाच्या शाळा सुरू असताना केवळ राज्य व केंद्रीय मंडळाच्या शाळा बंद का? शहरातील सर्व व्यवहार सुरू असताना शाळा बंद ठेवू नयेत, अशी मागणी पुन्हा एकदा पॅरेंट्स असोसिएशन ऑफ मुंबई २०२१ यांनी केली आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशनसोबत मुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री आणि मुंबईचे महापालिका आयुक्त यांना पत्र लिहून १५ दिवसांचा वेळ न दवडता येत्या २४ जानेवारीपासून मुंबईतील आणि राज्यातील शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी केली आहे. युनिसेफ, जागतिक बँक, टास्क फोर्स सदस्य व बालरोगतज्ज्ञ, डब्ल्यूएचओ संस्थेचे सदस्य या साऱ्यांकडून शाळा व शिक्षण ही समाजाची प्राथमिक गरज असून, ओमायक्रॉनच्या भीतीने शाळा बंद ठेवणे योग्य नाही, असे निष्कर्ष वारंवार पुढे आणले आहेत. तरीही राज्य शासनाला पुढील १५ दिवसांपर्यंत थांबू आणि ठरवू, असा निर्णय घेण्याची आवश्यकता का भासत असल्याचा प्रश्न संघटनेतील पालकांनी केला आहे. पॅरेंट्स असोसिएशन ऑफ मुंबई २०२१ संघटनेमध्ये मुंबईमधील तब्बल ६००० हून अधिक पालकांचा सहभाग असून, ही संघटना शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी विविध सामाजिक माध्यमातून वारंवार जनजागृती करीत आहे.  शाळा सुरू करण्याबाबत १५ दिवसांनी आढावा घेऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मात्र हा प्रकार म्हणजे शाळा सुरू करण्याच्या मागणीला पाने पुसण्यासारखे असल्याची टीका शिक्षण वर्तुळात होत आहे. काय आहेत या पालकांच्या मागण्या ?२४ जानेवारीपासून सर्व शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा शाळा सुरू झाल्यावर स्कूलबस सुरू करण्याचीही परवानगी मिळावी मार्गदर्शक सूचना जाहीर कराव्यात; मात्र शाळा ज्या सूचनांची, निर्देशांची अंमलबजावणी करू शकेल अशाच सूचना द्याव्यात (जसे की २ विद्यार्थ्यांमध्ये एका बाकांचे अंतर असावे, ६ फुटाचे नाही)सर्व शाळा व्यवस्थापनांना शाळा संमिश्र पद्धतीने सुरू ठेवण्याच्या सूचना द्याव्यात, जेणेकरून जे विद्यार्थी शहरांत नाहीत किंवा ज्या पालकांना मुलांना अद्यापही शाळांमध्ये पाठवायचे नाही ते ऑनलाइन शिक्षण घेऊ शकतील. शासनाने सूचना दिल्यावर शाळांना वर्ग भरवण्याचे कडक आदेश द्यावेत, शाळा सुरू करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापनावर सोडू नये.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या