शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

ST Workers Strike: संप करणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई ? एसटी महामंडळ ॲक्शन मोडमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 09:03 IST

ST Workers Strike: एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी गेल्या पाच महिन्यांपासून एसटीचा संप सुरू आहे. या संपात सहभागी असलेल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यासाठी ३१ मार्चची मुदत देण्यात आली होती.

मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी गेल्या पाच महिन्यांपासून एसटीचा संप सुरू आहे. या संपात सहभागी असलेल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यासाठी ३१ मार्चची मुदत देण्यात आली होती. तरीही  मोठ्या प्रमाणात कर्मचारी संपावर आहेत. ३१ मार्चपर्यंत हजर न झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ४७,७०७ आहे. या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुदतीपूर्वी जे संपकरी कर्मचारी कामावर हजर राहणार नाहीत त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता. त्यानुसार, जे कर्मचारी कामावर सध्या हजर राहत नाहीत, त्यांना नोकरीची गरज नाही असे समजून कारवाई केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील कामावर हजर न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. तरीही  ३१ मार्चपर्यंत ३३,९७६ कर्मचारी कामावर हजर झाले आहे. तर ३१ मार्च रोजी फक्त ६५४ कर्मचारी नव्याने हजर झाले आहेत. 

आज सुनावणी एसटी विलीनीकरणासंदर्भात अद्याप तोडगा निघालेला नाही. एसटी विलीनीकरणावर बाजू मांडण्यासाठी आम्हाला १५ दिवस द्या, अशी विनंती राज्य सरकारतर्फे न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार, मंगळवार ५ एप्रिल रोजी यावर सुनावणी होणार आहे. 

संपातील एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी ३१ मार्च मुदत देण्यात आली होती. तरीही अनेक कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत. त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. तर मुदतीत जे कर्मचारी रुजू झाले आहेत, त्यांना दिलासा मिळेल. - शेखर चन्ने, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

टॅग्स :ST Strikeएसटी संपMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार