शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचारी संप; २० डिसेंबरपर्यंत अहवाल द्या, उच्च न्यायालयाने दिले त्रिसदस्यीय समितीला निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 09:55 IST

एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीवर कामगार ठाम असल्याने त्यावर तातडीने निर्णय घेणे शक्य नाही. तत्पूर्वी, एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व २८ संघटनांचे म्हणणे ऐकण्यात येईल.

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याचे चिन्ह दिसत नसल्याने अखेरीस उच्च न्यायालयाने संपकऱ्यांच्या मागण्यांबाबत विचार करण्यासाठी नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीला २० डिसेंबरपर्यंत प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश सोमवारी दिले. तत्पूर्वी, न्यायालयाने समितीला एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटना, राज्य सरकार आणि एसटी महामंडळाची बाजू ऐकण्याचीही सूचना केली.एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीवर कामगार ठाम असल्याने त्यावर तातडीने निर्णय घेणे शक्य नाही. तत्पूर्वी, एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व २८ संघटनांचे म्हणणे ऐकण्यात येईल. प्रत्येक दिवशी दोन संघटनांचे म्हणणे समिती ऐकेल आणि याची सुरुवात मंगळवारपासून करण्यात येईल, अशी माहिती मुख्य सरकारी वकील पी. ए. काकडे यांनी न्या. पी. बी. वराळे व न्या. श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाला दिली. संपकरी संघटनांतर्फे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयाला सांगितले की, प्रशासन संपकऱ्यांवर दबाव आणत सेवेत रुजू होण्यासाठी जबरदस्ती करत आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही दोनजणांनी आत्महत्या केल्या. आतापर्यंत ४० जणांनी आत्महत्या केल्या.

शरद पवार, अनिल परब यांच्यात चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांची नेहरू सेंटरमध्ये ४ तास बैठक झाली. मात्र, ठोस निर्णय होऊ शकला नाही. संपावर कसा तोडगा काढता येईल याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विलीनीकरणाचा मुद्दा हा उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीसमोर आहे. तिथे राज्य सरकारने काय बाजू मांडावी याबाबतही पवारांसोबत चर्चा झाली. विलीनीकरणाबाबत समितीचा जो अहवाल येईल तो आम्ही स्वीकारू, असे परब यांनी बैठकीनंतर माध्यमांना सांगितले.

उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे एसटी सेवा सुरू व्हावी. तुम्ही संप करा; परंतु कोणी वाहक, चालक कामावर रुजू होण्यास इच्छुक असेल तर त्याला अडवू नका. शांततेने संप करा. कोणी हिंसा केली वा सेवेवर रुजू होण्यापासून अन्य कर्मचाऱ्यांना रोखत असेल तर महामंडळाने कायदेशीर कारवाई करावी.  - उच्च न्यायालय. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयST Strikeएसटी संपMaharashtraमहाराष्ट्र