शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

एसटी कर्मचाऱ्यांना आता बालसंगोपन रजा मिळणार, दिवाकर रावतेंची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 03:10 IST

एसटी महामंडळाच्या कर्मचा-यांना सहा महिन्यांची बालसंगोपन रजा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली.

मुंबई : एसटी महामंडळाच्या कर्मचा-यांना सहा महिन्यांची बालसंगोपन रजा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. महिला कर्मचारी, पत्नी हयात नसलेले पुरुष कर्मचारी तसेचज्या कर्मचा-यांची पत्नी असाध्य आजाराने अंथरुणाला खिळली आहे अशा पुरुष कर्मचा-यांना ही रजा मिळू शकेल.एसटी महामंडळाने महिला कर्मचा-यांना प्रसूती काळात सहाऐवजी नऊ महिन्यांची रजा देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. या निर्णयाचा पुढचा कौटुंबिक टप्पा म्हणून आता महिला कर्मचा-यांना बालसंगोपन रजाही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नोकरी करताना कुटुंबाकडे लक्ष देणे अवघड बनते. विशेषत: मुलांच्या परीक्षेच्या काळात सुट्यांची आवश्यकता भासते. त्यामुळे राज्य सरकारच्या धर्तीवर एसटी महामंडळातील महिला कर्मचा-यांना सहा महिने म्हणजेच १८० दिवसांची बालसंगोपन रजा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे रावते म्हणाले.महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने मोठ्या प्रमाणावर महिलांची भरती केली आहे. वाहक पदासह विविध पदांवर महामंडळात मोठ्या प्रमाणात महिला कर्मचारी आहेत. यात ग्रामीण भागातील मुलींची संख्या मोठी असून महामंडळाच्या नोकरीमुळे महिला कर्मचाºयांच्या कुटुंबाच्या आर्थिक सक्षमीकरणास मोठा हातभार लागत असल्याचेही रावते म्हणाले.असे आहेत रजेचे निकष- बालसंगोपन रजेसाठी राज्य सरकारी कर्मचा-यांना लागू असलेल्या अटी- शर्ती महामंडळातील कर्मचा-यांनाही लागू असतील.- मुलांचे वय १८ वर्षे होईपर्यंत ही रजा घेता येईल. पहिल्या दोन मुलांसाठी ही रजा घेता येणार असून एका वर्षात जास्तीत जास्त दोन महिन्यांची रजा घेण्याची मुभा आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ