शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नव्या गणवेशावर एसटी कर्मचारी नाखूश! सर्वेक्षणातील निष्कर्ष : ९० टक्के कर्मचा-यांनी दर्शविली नापसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 03:54 IST

राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शनिवारी राज्यभर नव्या गणवेश वितरणाचा सोहळा आयोजित केला होता. मात्र, नव्या गणवेशावर कर्मचारी वर्ग नाखूश दिसत आहे.

महेश चेमटेमुंबई : राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शनिवारी राज्यभर नव्या गणवेश वितरणाचा सोहळा आयोजित केला होता. मात्र, नव्या गणवेशावर कर्मचारी वर्ग नाखूश दिसत आहे. राज्यभर गणवेश वितरण सोहळ्याची केवळ ‘शोबाजी’ करण्यात आली. मुळात एसटीच्या नव्या गणवेशात काहीच विशेष बदल झालेला नाही. नव्या गणवेशाबाबत घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात ९० टक्के कर्मचाºयांनी या गणवेशाला नापसंती दर्शवली आहे.मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात गणवेश वाटप ‘इव्हेंट’ पार पडला. एकाच वेळी राज्यभर गणवेश वितरण सोहळा घेण्यात आला. तथापि, गणवेशाचे हलके कापड, अयोग्य माप या प्रमुख कारणांमुळे कर्मचारी नाराज झाले आहेत. एसटी महामंडळाने गणवेश वाटपानंतर राज्यभर एक सर्वेक्षण केले. यात ‘एसटी कर्मचा-यांसाठी नव्याने आलेला गणवेश तुम्हाला आवडला का?’ या प्रश्नावर हो, नाही आणि सांगता येत नाही, असे तीन पर्याय देण्यात आले होते. समाजमाध्यमांवर घेण्यात आलेल्या या सर्वेक्षणावर ९० टक्के कर्मचा-यांनी ‘नाही’ हा पर्याय निवडत नापसंती व्यक्त केली, तर ६ टक्के कर्मचाºयांनी सांगता येत नाही, हा पर्याय निवडला. केवळ ४ टक्के कर्मचा-यांनी एसटीच्या नव्या गणवेशाला पसंती दिली.एसटी संघर्ष गु्रपमध्ये राज्यभरातील कर्मचारी-अधिका-यांचा समावेश आहे. या ग्रुपच्या समाजमाध्यमांवर हे सर्वेक्षण करण्यात आले. गणवेश खरेदीसाठी ७३ कोटींचे कंत्राट देण्यात आले होते. कापडाची किंमत, शिलाई आणि कापडाची कंपनी आणि कोटेशन या मुद्द्यांवर माहिती अधिकाराखाली माहिती मागवावी, अशी मागणी आता एसटी कर्मचारी करत आहेत.नाशिक, उस्मानाबाद येथील कर्मचाºयांनी गणवेश वितरण सोहळा म्हणजे केवळ ‘शोबाजी’ असल्याचा आरोप केला. औरंगाबाद येथील कर्मचा-यांनी अयोग्य माप, तसेच गणवेश खराब असल्यामुळे ते परत करत कार्यक्रमावर बहिष्कार घातला. चिखलठाणा कार्यशाळेतदेखील अयोग्य मापामुळे कर्मचा-यांनी गणवेश परत करत, नव्या गणवेशाचा निषेध व्यक्त केला.कर्मचा-यांच्या ‘निवडक’ प्रतिक्रिया‘कपडे बदलने से इंसान की जिंदगी नहीं बदलती और न ही उसकी औकात बदलती है.’ मंत्री महोदयजी. - गुड्डू पठाणअजून गणवेश दिला नाही, दिल्यावर बोला, नको त्या गोष्टीवर बोलू नका. - समाधान देवकरगणवेश आमच्या हक्काचा आहे, उपकार केल्यासारखे दाखवू नका. - रघुनाथ गाडे

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ