शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्यांच्या उपदानात दुप्पट वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 03:57 IST

आता एसटी कर्मचाऱ्यांना दहा लाखांऐवजी वीस लाख रुपये उपदान रक्कम मिळणार

वाशिम: राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांच्या उपदान (ग्रॅच्युईटी) रकमेत केंद्र शासनाच्या परिपत्रकानुसार दुप्पट वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता एसटी कर्मचाऱ्यांना दहा लाखांऐवजी वीस लाख रुपये उपदान रक्कम मिळणार आहे. २९ मार्च २०१८ पासून याचा लाभ देण्यात येत असून, या तारखेला किंवा त्यानंतर निवृत्त झालेल्या किंवा सेवेतून कमी केलेल्या परंतु उपदानास पात्र कर्मचाºयांना यातील फरकाची रक्कम मिळणार आहे. एसटी महामंडळाने या संदर्भात २० जून रोजी परिपत्रक जारी करून सर्व विभाग नियंत्रकांना याची अंमलबजावणी करण्याच्या सुचना दिल्या आहेत.केंद्र शासनाने उपदान प्रदान अधिनियम १९७२ नुसार द्यावयाच्या उपदानाची कमाल मर्यादा १७ मे २०१० च्या अध्यादेशाद्वारे १० लाख रुपये केली होती. कर्मचारी वर्ग खाते परिपत्रक २८ जून २०१० नुसार ही कमाल मर्यादा एसटी महमांडळाच्या अधिकारी, कर्मचाºयांनाही लागू करण्यात आली होती. त्यानंतर केंद्र शासनाने २९ मार्च २०१८ ला राजपत्रित अधिसुचना काढून उपदानाच्या कमाल मर्यादेत सुधारणा केली आहे. यानुसार आता उपदानाची मर्यादा १० लाखांहून २० लाख करण्यात आली असून, ही कमाल मर्यादा २९ मार्च २०१८ पासूनच लागू करण्याची अधिसुचना केंद्र शासनाच्या श्रम, रोजगार मंत्रालयाने प्रसारित केली आहे. महामंडळाने अधिसुचनेच्या अंमलबजावणीबाबत २० जून रोजी परिपत्रक जारी केले आहे. या अंतर्गत राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाºयांना पुरवणी उपदानासह उपदानाची कमाल मर्यादा २० लाख लागू केली आहे. यानुसार मार्च २०१८ मध्ये एसटी महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झालेले किंवा अन्य कारणांमुळे २९ मार्च २०१८ पासून सेवेतून कमी झालेल्या; परंतु उपदानास पात्र असलेल्या अधिकारी, कर्मचाºयांना जुन्या कमाल मर्यादेप्रमाणे अदा केलेल्या उपदानाप्रकरणी नवीन कमाल मर्यादेनुसार फरकाचे देयक मिळेल.

टॅग्स :state transportएसटी