शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ST Employee Strike: संपामुळे ऐन दिवाळीत एसटी प्रवाशांचे हाल; कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 07:37 IST

एसटीचे राज्यातील २५० पैकी ३६ आगार बंद. कामगार संघटनांनी अनिल परब यांची भेट घेतल्यानंतर बहुतांश आगार २९ ऑक्टोबर रोजी पुन्हा सुरू झाले, तर ३५ आगारांमधील कर्मचारी एमएसआरटीसीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या आणि इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या आंदोलनामुळे एसटीच्या राज्यभरातील २५० आगारांपैकी ३६ आगारातील वाहतूक ठप्प झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या संपामुळे त्या भागातील प्रवाशांचे हाल होणार आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांनी महागाई भत्ता आणि इतर मागण्यांसाठी पुकारलेले उपोषण गुरुवारी मागे घेण्यात आले होते; मात्र आता विलीनीकरणाच्या मुद्यावरून एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहेत. या संपामुळे राज्यभरात सोमवारी  ३६ आगार बंद होते. यात औरंगाबाद विभागातील ४७ पैकी सर्वाधिक १५ आगार, त्यानंतर नागपूर क्षेत्रातील २६ पैकी १२ आगार बंद करण्यात आले. तसेच पुणे विभागातील चार, नाशिकमधील तीन, अमरावतीमधील दोन  आगार  सध्या आंदोलनामुळे बंद आहेत. एसटी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ ऑक्टोबरपासून सुरू असलेले त्यांचे आंदोलन बेकायदेशीर असल्याचे औद्योगिक न्यायालयाने घोषित केले असले तरी, उपक्रमाने कर्मचाऱ्यांना कोणतीही नोटीस बजावली नाही. कर्मचाऱ्यांनी महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि पगार वाढवण्याच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनामुळे राज्यात १९० आगार बंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कामगार संघटनांनी अनिल परब यांची भेट घेतल्यानंतर बहुतांश आगार २९ ऑक्टोबर रोजी पुन्हा सुरू झाले, तर ३५ आगारांमधील कर्मचारी एमएसआरटीसीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत.

बस सेवा सुरू ठेवण्याचा प्रयत्नविदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली येथील सर्व आगार  आणि मराठवाड्यातील नांदेड आणि लातूरमधील बहुतांश आगार आंदोलनामुळे बंद आहेत. आम्ही राज्यात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरु केली आहे. सणासुदीच्या काळात लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी जास्तीत जास्त आगारातून बस सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत.- शेखर चन्ने, उपाध्यक्ष,एसटी महामंडळ

कारवाई करू नकाएसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, तसेच राज्यात आंदोलन केलेल्या कोणत्याही एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करू नये. अन्यथा राज्यातील सर्व एसटी वाहतूक बंद करण्यात येईल.     - प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते विधान परिषद

‘दिवाळीच्या तोंडावर जनतेची गैरसोय टाळा’लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एसटी ही सर्वसामान्य माणसांची जीवनवाहिनी आहे. दिवाळीच्या तोंडावर प्रवासी गर्दी वाढणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच जनतेची एसटीवरील विश्वासार्हता जपण्यासाठी अघोषित संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी कामावर तातडीने रुजू व्हावे, जनतेची एसटीशी असलेली नाळ तुटू देऊ नका, असे आवाहन परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी केले. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांसोबत आपण दिवाळीनंतर चर्चा करणार असल्याचेही ॲड.परब यांनी स्पष्ट केले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्याचे वेतन नोव्हेंबर महिन्याच्या १ तारखेला म्हणजेच दिवाळीपूर्वी देण्याची जाहीर केले होते. त्यानुसार सुधारित महागाई व घरभाडे भत्त्यासह ऑक्टोबर २०२१ चे वेतन त्याचबरोबर दरवर्षी दिली जाणारी दिवाळी भेट सोमवारी सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

 

टॅग्स :state transportएसटी