शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे; परिवहन मंत्र्यांसोबतची बैठक सफल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2018 22:07 IST

दोन दिवसांनंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे

मुंबई: पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मिटवण्यात अखेर राज्य सरकारला यश आलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला होता. त्यामुळे राज्यातील प्रवासी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. याच पार्श्वभूमीवर सर्व कामगार संघटना आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यात आज महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाल्यानं एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्यानंतर संघटनांनी संप मागे घेत असल्याचं जाहीर केलं.

महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांसाठी नुकतीच ऐतिहासिक अशी 4,849 कोटी रुपयांची वेतनवाढ जाहीर केल्याचं दिवाकर रावतेंनी बैठकीत सांगितलं. 'ऐतिहासिक वेतनवाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ होणार आहे. मात्र याबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये अनेक गैरसमज आहेत. कर्मचाऱ्यांनी असं न करता आपली वेतनवाढ नेमकी किती झाली, हे आधी समजून घेणं गरजेचं आहे. सर्व कर्मचाऱ्यांना चांगली वेतनवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेला बेकायदेशीर संप मागे घेऊन तातडीने कामावर रुजू व्हावं', असं आवाहन मंत्री रावते यांनी केलं. एसटी कर्मचाऱ्यांनी संपादरम्यान केलेल्या गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांवर कारवाई होईल. इतर कारवाईतून त्यांना मुक्त करण्यात येईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. या बैठकीला कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. कर्मचाऱ्यांनी अचानक सुरू केलेला संप मागे घ्यावा, असं आवाहन रावतेंनी पदाधिकाऱ्यांनी केलं. या आवाहनाला संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि संप मागे घेत असल्याचं जाहीर केलं. 

टॅग्स :ST Strikeएसटी संपMaharashtraमहाराष्ट्र