शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! निलंबनाच्या भीतीनं एसटी कर्मचाऱ्याचा ह्दयविकाराच्या झटक्यानं मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 22:30 IST

एसटी कर्मचारी अनिल कांबळे यांचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे

कोल्हापूर – राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघाला नाही. कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असल्याचं कोर्टाने सांगितले आहे. मात्र तरीही कर्मचारी आंदोलनावर ठाम असल्याने महामंडळाने कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. आतापर्यंत ९०० हून अधिक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. तर काही कर्मचारी निलंबनाच्या भीतीने पुन्हा कामावर रुजू होऊ लागले आहेत.

मात्र कोल्हापूरात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात दुर्दैवी घटना घडली आहे. याठिकाणी एसटी कर्मचारी अनिल कांबळे यांचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. अनिल यांनी निलंबनाच्या भीतीने गेल्या २ दिवसांपासून अन्न पाण्याचा त्याग केला होता. अनिल कांबळे हे सावंतवाडी आगारात चालक कम वाहक म्हणून कार्यरत होते.

परिवहन मंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा नाही

परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत कुठलाही सकारात्मक तोडगा निघाला नाही. या बैठकीबाबत गोपीचंद पडळकर म्हणाले की, आजच्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. अद्याप संप मागे घेतला नाही. १२ आठवड्यांची मुदत कमी करण्यासाठी सरकारने सकारात्मकता दाखवली आहे. समितीचा अहवाल येत नाही, तोवर सरकार काही करू शकत नाही, अस सरकारच म्हणणं आहे.

तर एसटी कर्मचारी संपावर तोडगा काढण्यासाठी आज बैठक झाली. विलीनीकरनाची मागणी त्यांची आग्रही होती. पण, ती मान्य होऊ शकत नाही कारण हे प्रकरण कोर्टात आहे. १२ आठवड्याचा कालावधी कमी करण्याची मागणी झाली.. त्यावर कालावधी कमी करून अहवाल लवकर देण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दिले. सकारात्मक अहवाल आला तर काही करू शकत नाही पण, नकारात्मक अहवाल आला तर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याची मागणीवर विचार करून निर्णय घेण्यास सरकार सकारात्मक आहे. आता ते कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यास गेले आहे. सरकारच्या चर्चेची दार उघडी आहेत. एसटी खूप नुकसानात आहेत त्यामुळे संप मागे घ्यावा असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब(Anil Parab) यांनी केले.

राज ठाकरेंनी घेतली होती शरद पवारांची भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thakceray) यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. या भेटीत एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळही होते. शरद पवारांनीही या मुद्द्यावर सकारात्मक भूमिका घेतली. त्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी शरद पवारांची भेट घेतली. एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावर सुवर्णमध्य साधावा अशी सूचना पवारांनी परिवहन मंत्र्यांना दिली. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप लवकरच संपेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :ST Strikeएसटी संप