कळंब/कसबे तडवळे (उस्मानाबाद) : कळंबहून उस्मानाबादकडे येणाऱ्या बसच्या चालकाला बुधवारी गोपाळवाडीजवळ चालत्या बसमध्येच हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मृत्यू झाला. डी. के. शेख (५७, रा. धोत्रा ता. बार्शी, सोलापूर) असे या दुर्दैवी चालकाचे नाव आहे.सुदैवाने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या एका बांधावर जाऊन थांबल्यामुळे मोठा अपघात टळला. कळंब- खामसवाडी- तडवळा-उस्मानाबाद गोपाळवाडीच्या पुढे गेल्यानंतर बस रस्ता सोडत असल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आले. त्याच वेळेस चालक शेख हे बोनेटवर कोसळले. मात्र सुदैवाने बस रस्त्याच्या खाली उतरून एका बांधावर मधोमध थांबली. प्रवाशांनी निपचित पडलेल्या चालकाला बोलते करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला होता. (प्रतिनिधी)
एसटी चालकाचा हृदयविकाराने मृत्यू
By admin | Updated: February 26, 2015 05:56 IST