शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळाला मिळणार ७०० नव्या गाड्या, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 01:42 IST

राज्याची जीवनवाहिनी असणा-या एसटीच्या ताफ्यात आता नव्या को-या सातशे बसेस दाखल होणार आहेत. नवीन बस खरेदीसाठी राज्य सरकारकडून महामंडळाला निधी देण्यात येणार आहे.

मुंबई : राज्याची जीवनवाहिनी असणा-या एसटीच्या ताफ्यात आता नव्या को-या सातशे बसेस दाखल होणार आहेत. नवीन बस खरेदीसाठी राज्य सरकारकडून महामंडळाला निधी देण्यात येणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची माहिती दिली.सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात अलीकडेच एक बैठक झाली. यावेळी एस.टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजिसिंह देओल यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. एसटीचा प्रवास अधिक आरामदायक आणि सुरक्षित व्हावा यासाठी राज्य सरकार नवीन बसखरेदीसाठी निधी देणार असल्याचे मुनगंटीवार यांनी बैठकीत स्पष्ट केले.बस खरेदीसाठी लागणाऱ्या निधीपैकी १२.५ कोटींचा निधी नजीकच्या काळात दिला जाईल तर उर्वरित निधी विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात उपलब्ध करून दिला जाईल. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात यासाठी महामंडळाने ही पुढाकार घेऊन बस स्थानके सुंदर आणि स्वच्छ ठेवावीत, असे आवाहन ही मुनगंटीवार यांनी यावेळी केले.बैठकीत त्यांनी वर्धा, देवळी, सेलू, वडसा, गडचांदूर, कोरपना, नागभीड, चंद्रपूर, मूल, बल्लारपूर, सावली, पोंभुर्णा, घुग्गूस, भद्रावती, राजुरा, चिमूर बस स्थानकांच्या कामांचा ही आढावा घेतला. वर्धा, देवळी, मूल, बल्लारपूर, सावली, पोंभुर्णा, घुग्गुस, भद्रावती, राजुरा चिमूर बसस्थानकाच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी चंद्रूपर, मूल, बल्लारपूर बस स्थानकांच्या कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. उर्वरित स्थानकांच्या कामांना ही गती देण्यात यावी, कंत्राटदारांना वेळेत आणि दर्जेदार काम करून घ्यावे, अशा सूचनाही अर्थमंत्र्यांनी यावेळी दिल्या.सहा महिन्यात विठाई बस सेवा सुरू५०० बस खरेदीसाठी महामंडळाला अर्थसहाय्य करावे तसेच पंढरपूर यात्रेदरम्यान ‘विठाई’ संकल्पनेवर आधारित २०० बससाठी निधी द्यावा अशी मागणी केली होती. त्यानूसार अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी ७०० बस खरेदीसाठी अर्थ सहाय्य देण्याची तयारी दर्शवली आहे. १०० ते १५० किलोमीटर अंतराच्या प्रवासासाठी ‘विठाई’ योजनेखाली एसटी सेवा सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचे सर्र्व्हेेक्षणाचे काम सुरु असून सहा महिन्यात प्रत्यक्ष विठाई बस सेवा सुरू होईल.महामंडळाच्या ताफ्यात सध्या १९ हजार एसटी बसेस आहेत. नुकत्याच महामंडळाने भाडेतत्वावर १५०० शिवशाही आणि स्वमालकीच्या ५०० शिवशाही बस ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी सुमारे ९०० बस एसटी ताफ्यात दाखल झाल्या आहेत.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार