शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 09:46 IST

ST Bus Ticket Fare Hike News: प्रत्येक तिकिटावर किती अधिभार आकारला जाणार? कोणाला यातून सूट देण्यात आली आहे? जाणून घ्या...

ST Bus Ticket Fare Hike News: राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या तिकीट दरामध्ये १५ एप्रिलपासून १० टक्के हंगामी वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावाला जाताना प्रवाशांना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे. या भाडेवाढीमुळे एसटीचा लांब पल्याचा प्रवास ९० ते १०० रुपयांनी महागणार आहे. यानंतर आता एसटी महामंडळाने प्रत्येक तिकिटावर ‘स्वच्छता अधिभार’ लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे एसटी लालपरीचा प्रवास आणखी महागणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाची राज्यभरात २५१ आगारे व ५९८ बसस्थानके आहेत. तसेच महामंडळाच्या बसमधून दैनंदिन सरासरी ५५ लाख प्रवाशांची वाहतूक करण्यात येते. प्रवाशांची वाहतूक करताना त्यांना स्वच्छ बस उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर स्वच्छ बसस्थानक उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या अनुषंगाने एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून स्वच्छता अधिभार आकारण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. एसटी महामंडळाच्या प्रवास भाड्यात प्रति प्रवासी २ रुपये स्वच्छता अधिभार लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

१५ एप्रिल २०२६ पासून प्रत्येक तिकिटावर २ रुपये स्वच्छता अधिभार

या निर्णयानुसार १५ एप्रिल २०२६ पासून प्रवासी भाड्यात स्वच्छता अधिभाराची आकारणी करण्यात येणार आहे. प्रत्येक तिकिटावर २ रुपये याप्रमाणे शुल्क आकारण्यात येणार आहे. बस स्थानके, बसेस व कार्यालयांची दररोज स्वच्छता करण्यात येणार आहे. लवकरच बस स्थानकांवरील सर्व स्वच्छतालये प्रवाशांसाठी मोफत केली जाणार आहेत. तसेच दैनंदिन स्वच्छतेचा संपूर्ण खर्च एसटी महामंडळ स्वतः उचलणार असल्याचे सांगितले जात आहे. दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून स्वच्छता अधिभार आकारणी करून स्वच्छता अधिभारापोटी प्राप्त होणाऱ्या निधीतून प्रवाशांना व एसटी कर्मचाऱ्यांना अधिक दर्जेदार स्वच्छताविषयक सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. स्वच्छ असणाऱ्या एसटीकडे प्रवासी वर्ग अधिक वळेल, असा विश्वास एसटी महामंडळाने व्यक्त केला आहे. 

दरम्यान, विशेष बससेवेअंतर्गत देण्यात येणाऱ्या बससाठी प्रति दिन प्रति बस ५० रुपये आकारले जाणार आहेत. आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेअंतर्गत पासधारक प्रवासी ५ रुपये आकारले जातील. महिला सन्मान योजना व ज्येष्ठ नागरिक (६५ वर्षावरील व ७५ वर्षा पर्यंतचे ज्येष्ठ नागरिक), अमृत ज्येष्ठ नागरिक, अन्य सर्व सवलतधारी प्रवाशांकडून दोन रुपये आकारले जाणार आहेत. विद्यार्थ्यांकडून स्वच्छता अधिभारापोटी कोणतेही अतिरिक्त शुल्क वसूल करण्यात येणार नाही. विद्यार्थ्यांबाबत मासिक पास, अहिल्याबाई होळकर विद्यार्थीनी पास, मानवविकास, सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांना घरी जाणे यासाठी अधिभार आकारला जाणार नाही. सद्यस्थितीत सर्व आगारात ईटीआय मशीनद्वारे तिकीट विक्री करण्यात येत आहे. ईटीआय मशीनमध्ये असलेल्या टप्पा व दरपत्रकामध्ये स्वच्छता अधिभाराचा समावेश ईबिक्स टेक्नॉलॉजीस लिमिटेड यांच्याद्वारे आवश्यक ते तांत्रिक बदल केले जातील.

English
हिंदी सारांश
Web Title : ST Hikes Fares, Adds 'Cleanliness Levy,' Burdening Passengers Further

Web Summary : Maharashtra State Transport increased fares by 10% and imposed a ₹2 'cleanliness levy' per ticket. This will additionally burden passengers. The revenue will improve bus and station sanitation, benefiting travelers and staff.
टॅग्स :state transportएसटीState Governmentराज्य सरकारticketतिकिट