शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माझी एसटी कुठे आहे..?, एसटीची ॲपसेवा रखडली; १५ ऑगस्टची डेडलाइन हुकली, आता पुढे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 12:53 IST

कंत्राटदाराने वेळेत काम पूर्ण न केल्यास त्याच्यावर कारवाई या इशाऱ्याचे काय झाले? असाही सवाल उपस्थित होत आहे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आपण जिची आतुरतेने वाट पाहत आहोत, ती एसटी बस नेमकी कुठे आहे, हे प्रवाशांना माहीत व्हावे म्हणून मोबाइल ॲपसेवा १५ ऑगस्टला सुरू करण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली होती, मात्र अद्याप ती सेवा सुरू न झाल्याने अधिकाऱ्यांना त्यांच्याच घोषणेचा विसर पडल्याचे चित्र आहे.

एसटीची श्वेतपत्रिका जाहीर करताना जूनमध्ये प्रस्तुत प्रतिनिधीने मंत्री सरनाईक यांना ॲपसेवेविषयी विचारले असता त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या हवाल्याने १५ ऑगस्टचा मुहूर्त दिला होता. या सेवेचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे एप्रिलमध्ये सांगण्यात आले होते, तर सर्व काम पूर्ण झाले असून १५ ऑगस्ट रोजी ही ॲपसेवा सुरू करणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी म्हटले होते.

तांत्रिक बाबींमुळे ॲपला विलंब होत आहे. याबाबत मी स्वतः लक्ष घालत आहे. मंत्रालयामध्ये मी बैठक बोलावली असून चर्चा करणार आहे. -प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री

इशाऱ्याचे काय झाले? :

कंत्राटदाराने वेळेत काम पूर्ण न केल्यास त्याच्यावर कारवाई करणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी एप्रिलमध्ये सांगितले होते. २०१९ पासून या ॲपचे काम सुरू असून, ते सहा महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित होते. 

असे माहीत होईल एसटीचे लोकेशन

प्रवाशांनी काढलेल्या तिकिटावर असलेला ट्रिप कोड एसटीच्या ॲप्लिकेशनमध्ये ट्रॅक बसवर टाकल्यावर तिचे लोकेशन समजू शकेल. त्यामध्ये इतर मार्गावरील गाड्या, त्यांची वेळ, त्या सर्व गाड्यांच्या थांब्याचीही माहितीही मिळणार आहे. नियंत्रणासाठी एसटीच्या मुंबई सेंट्रल मध्यवर्ती कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.  

टॅग्स :state transportएसटीpratap sarnaikप्रताप सरनाईक