शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोस्टमॉर्टेमनंतर कुटुंबीयांना सोपवलं श्रीदेवींचं पार्थिव शरीर, उद्या होणार अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2018 18:43 IST

बॉलिवूडमधील प्रख्यात अभिनेत्री श्रीदेवींचं हृदयविकाराच्या झटक्यानं शनिवारी रात्री दुबईत निधन झालं. त्यानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली.

मुंबई- बॉलिवूडमधील प्रख्यात अभिनेत्री श्रीदेवींचं हृदयविकाराच्या झटक्यानं शनिवारी रात्री दुबईत निधन झालं. त्यानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली. मुंबईतल्या श्रीदेवी यांच्या निवासस्थानी सिनेकलाकार, नातेवाईक आणि चाहत्यांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली आहे. दुबईत श्रीदेवींच्या पार्थिव शरीराचं पोस्टमॉर्टेम पूर्ण झालं असून, त्यांचे पार्थिव शरीर नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आलं आहे.आज रात्री 8 वाजताच्या दरम्यान चार्टर्ड विमानातून श्रीदेवींचं पार्थिव शरीर मुंबईत दाखल होणार आहे. मुंबईतून दुपारी एकच्या सुमारास निघालेलं चार्टर्ड विमान दुबईत संध्याकाळी 4 वाजता पोहोचलं आहे. तिथून श्रीदेवींचं पार्थिव शरीर घेऊन हे विमान 5 वाजताच्या सुमारास निघालं असून, रात्री 8 वाजता ते मुंबईत दाखल होणार आहे. मुंबईतल्या विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीत सोमवारी सकाळी श्रीदेवींच्या पार्थिव शरीरावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. एका विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी श्रीदेवी पती बोनी कपूर आणि मुलगी खुशीसह दुबईत होत्या. मात्र, दुसरी मुलगी जान्हवी कपूर चित्रीकरणात व्यस्त असल्यामुळे दुबईत गेली नव्हती.मृत्यूपूर्वी बाथरूममध्ये पाय घसरून पडल्या होत्या श्रीदेवीबॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री दुबईत निधन झाले. भाचा मोहिम मारवाह याच्या लग्नासाठी श्रीदेवी दुबईला गेल्या होत्या. हा लग्न सोहळा आनंदात पारही पडला.  पण याचदरम्यान शनिवारची रात्र श्रीदेवींच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी घेऊन आली. प्राप्त माहितीनुसार, शनिवारी रात्री श्रीदेवी बाथरूममध्ये पाय घसरून पडल्या आणि पडताक्षणी बेशुद्ध झाल्या. त्यांना ताबडतोब रूग्णालयात हलवण्यात आले. रुग्णालयात पोहोचल्यावर त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, हे स्पष्ट झाले. याच झटक्याने त्यांचे निधन झाले.श्रीदेवी, त्यांचे पती बोनी कपूर, मुलगी खुशी असे सगळेच मोहितच्या लग्नासाठी गेले होते. याशिवाय अख्खे कपूर घराणे या लग्नात सहभागी झाले होते. अभिनेते संजय कपूर हेही या सोहळ्याला हजर होते. शनिवारी रात्री १२ वाजता संजय दुबईहून मुंबईत पोहोचले. पण येथे पोहोचताच त्यांना श्रीदेवींच्या निधनाची बातमी कळली. त्यांनी लगेच दुबईची फ्लाईट पकडली आणि ते आल्या पावली माघारी परतले.

टॅग्स :Srideviश्रीदेवी