शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

कोल्हापुरातील एकमेव कसोटीपटू एस.आर.पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 3:18 PM

ज्येष्ठ माजी कसोटीपटू व महाराष्ट्र क्रिकेट संघाचे कर्णधार एस. आर. पाटील (वय ८७, रा. रूईकर कॉलनी) यांचे आज पहाटे निधन झाले. इंग्लंडमधील क्‍लबकडून खेळताना त्यांनी तीनदा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळविला होता. तसेच तेथील माध्यमांनी त्यांची दखल घेत प्रसिद्धी दिली होती.

ठळक मुद्दे कोल्हापुरातील एकमेव कसोटीपटू एस.आर.पाटील यांचे निधन इंग्लंडमधील क्‍लबकडून तीनदा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान, महाराष्ट्र क्रिकेट संघाचे कर्णधार

कोल्हापूर- ज्येष्ठ माजी कसोटीपटू व महाराष्ट्र क्रिकेट संघाचे कर्णधार एस. आर. पाटील (वय ८७, रा. रूईकर कॉलनी) यांचे आज पहाटे निधन झाले. इंग्लंडमधील क्‍लबकडून खेळताना त्यांनी तीनदा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळविला होता. तसेच तेथील माध्यमांनी त्यांची दखल घेत प्रसिद्धी दिली होती.

पाटील मूळचे कसबा ठाणे (ता. पन्हाळा) येथील रहिवासी. त्यांचा १० ऑक्‍टोबर १९३३ ला जन्म झाला. वडील रावजी पाटील यांना मुलाने क्रिकेटमध्ये कोल्हापूरचे नाव उचंवावे, अशी इच्छा होती. पाटील यांनी वडिलांच्या इच्छेसाठी क्रिकेटचा कसून सराव केला. त्यांचे न्यू हायस्कूलमधून शालेय शिक्षण झाले. ते इंग्लंडमधील लंकेशायर, नॉर्थस्टॅण्पोर्डशायर व नॅन्टविच क्‍लबकडून खेळले.

क्‍लबकडून खेळताना त्यांची गोलंदाजी आणि फलंदाजीची आकडेवारी थक्क करणारी ठरली. इंग्लंडमधील माध्यमांनी त्याची दखल घेत त्याला प्रसिद्धी दिली. इंग्लंडमध्ये त्यांनी तीनदा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळवला. तसेच उत्कृष्ट व्यावसायिक खेळाडू म्हणून त्यांची कारकीर्द प्रभावी ठरली.न्यूझीलंडविरूद्धच्या एकमेव कसोटीत त्यांची निवड झाली होती. कर्णधार पॉली उम्रीगर यांच्या नेतृत्त्वाखाली ही कसोटी भारतीय संघाने जिंकली.सदाशिव रावजी पाटील यांनी एकमेव कसोटीत बावीसाव्या वर्षी १९५५ मधे झालेल्या न्यूझीलंडविरूध्दच्या दुसऱ्या मुंबईतील ब्रेबाँर्नवर कसोटीत पदार्पण केले. या कसोटीत त्यानी नाबाद १४ धावा केल्या तर दोन्ही डावात जाँन रीडला बाद केले होते.

पहिल्या डावात १४-३-३६-१ व दुसऱ्या डावात ९-४-१५-१ अशी गोलंदाजी केली. दुदैवाने त्याना परत कसोटीत संधी मिळाली नाही. प्रथम श्रेणीच्या सामन्यातही त्यांनी अष्टपैलू खेळ केला. ते १९५२ ते १९६४ दरम्यान महाराष्ट्र संघाकडून खेळले. त्यात त्यांनी ३६ सामन्यात तीन अर्धशतकांसह ८६६ धावा केल्या. गोलंदाजीत ३०.६६ च्या सरासरीने ८३ गडी बाद करत वेगळा ठसा उमटवला. प्रथम श्रेणीत ३८ धावांत पाच गडी बाद ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी ठरली.

एस आर पाटील हे जे. आर. डी. टाटा यांच्या स्वदेशी मिलमध्ये ३६ वर्षे कार्यरत होते. जे. आर. डी. टाटा यांचा त्यांच्या गोलंदाजीवर जबरदस्त आत्मविश्‍वास होता. त्यांना श्रीमंत छत्रपती शहाजी महाराज यांचे प्रोत्साहन, तर जतचे राजे डफळे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. क्रिकेट वर्तुळात डी. आर पाटील, एम. आर. पाटील यांनी चमकदार कामगिरी केली. त्यांचे हे बंधू होत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर