शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

युवा क्रिकेटपटू राजवर्धनबाबत क्रीडा खात्याचा आततायीपणा; क्रीडामंत्री सुनील केदार यांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 09:23 IST

आ. सतीश चव्हाण यांनी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्ताच्याआधारे हा प्रश्न लावून धरल्यानंतर क्रीडामंत्री सुनील केदार यांनी राजवर्धनच्या वयाचा वाद काढून क्रीडा खात्याने आततायीपणा केल्याची कबुली दिली. 

मुंबई/उस्मानाबाद : उस्मानाबादचा युवा क्रिकेटपटू राजवर्धन हंगरगेकर याच्या वयावरून उठलेल्या वादळाची धूळ आता खाली बसलेली असली तरी, मंगळवारी विधानभवनात हा मुद्दा पुन्हा पटलावर आला. आ. सतीश चव्हाण यांनी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्ताच्याआधारे हा प्रश्न लावून धरल्यानंतर क्रीडामंत्री सुनील केदार यांनी राजवर्धनच्या वयाचा वाद काढून क्रीडा खात्याने आततायीपणा केल्याची कबुली दिली. उस्मानाबाद येथील युवा क्रिकेटपटू राजवर्धन हंगरगेकर हा १९ वर्षांखालील विश्वविजेत्या भारतीय संघाचा सदस्य आहे. या विश्वचषकात व तत्पूर्वी झालेल्या आशिया चषकातही त्याने चमकदार कामगिरी केली होती. या बळावर त्याला आयपीएलमधील चेन्नई संघाने आपल्या ताफ्यात दीड कोटी रुपये मोजून समाविष्ट केले आहे. याचदरम्यान, राज्याच्या क्रीडा विभागाने त्याच्या वयाचा वाद उकरून काढला होता. राजवर्धनवर वय चोरीचा आरोप केला गेला; मात्र उस्मानाबाद जिल्हा परिषदेने केलेल्या चौकशीतून राजवर्धनला क्लीन चिट मिळाली आहे. याबाबतीत ‘लोकमत’ने पहिल्यांदा हे वृत्त उजेडात आणले होते.  या पार्श्वभूमीवर क्रीडा खात्याने एखाद्या उमद्या खेळाडूला प्रोत्साहन द्यायचे सोडून, त्याचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केल्याचा आरोप मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केला आहे. त्यांनी मंगळवारी यासंदर्भात विधानभवनात आवाज उठविला. क्रीडामंत्र्यांनी दिले हे उत्तर...राजवर्धनच्या बाबतीत तक्रार झाली. त्याबाबतीत पूर्ण शहानिशा करून घेण्याच्या आधीच आमच्या खात्याने आततायीपणा दाखविला. एखाद्या खेळाडूचे संतुलन बिघडविण्याचे काम आमच्याकडून झाले असेल, तर निश्चितच संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असे उत्तर क्रीडामंत्री सुनील केदार यांनी सभागृहात दिले. राजवर्धनच्या वयाच्या बाबतीत क्रीडा खात्याच्या अधिकाऱ्यांनी चुका केल्या आहेत. या प्रकरणात त्याला नोटीस पाठवून देण्यात आली. नंतर त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. त्याने लावलेले वय योग्य निघाले. मग या प्रकरणात चुका करणाऱ्यांवर कारवाई होणार की नाही, असा सवाल आमदार सतीश चव्हाण यांनी क्रीडा मंत्र्यांना केला.  

टॅग्स :Sunil Kedarसुनील केदार