शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणाला वेग द्या

By admin | Updated: September 20, 2016 01:32 IST

लोहगाव विमानतळाच्या कामांना तातडीने सुरुवात करण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी दिल्या.

पुणे : पुणे महापालिका, एअरपोर्ट अथॉरिटी व एअरफोर्सने समन्वयाने काम करीत लोहगाव विमानतळाच्या कामांना तातडीने सुरुवात करण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी दिल्या. लोहगाव विमानतळ वाहतुकीबाबत बापट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस महापालिका आयुक्त कुणाल कुमार, जिल्हाधिकारी सौरभ राव, आमदार जगदीश मुळीक, इंडियन एअरफोर्सचे वेस्टर्न रिजनचे एअर आॅफिसर कमांडिंग इन चीफ भारती, ग्रुप कॅप्टन यू. मनोज, एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटीचे पुणे डायरेक्टर अजय कुमार, व्ही. के. सुरी, पी. एम. जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, महापालिकेचे अधीक्षक अभियंता राजेंद्र राऊत, शहर अभियंता प्रशांत वाघमारे उपस्थित होते.पुरू सोसायटी ते एअरपोर्ट रोड येथील ९०० मीटर रस्ता ए-बी, ५०१ चौक ते स. नं. २३८ पर्यंतचा ४०० मीटर रस्ता, स. नं. २१४ येथील अस्तित्वातील काँक्रिट रस्ता ते एअरपोर्ट हद्दीपर्यंत प्रस्तावित २८० मीटर रस्ता इ-एफ, ५०१ चौक ते एअरपोर्ट गेटपर्यंतच्या जुन्या रस्त्याचे विस्तारीकरण या विषयावर चर्चा करण्यात आली. या रस्त्यांच्या कामांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी पालकमंत्री बापट यांना दिली. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीतील चर्चे नुसार तातडीने कामे सुरू करण्याच्या सूचना बापट यांनी या वेळी दिल्या. (प्रतिनिधी)>गिरीश बापट म्हणाले, ‘‘लोहगाव विमानतळावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करीत असतात. विमानतळाला जोडणारे रस्ते अरुंद असल्याने या ठिकाणी वारंवार वाहतुकीची कोंडी होत असते. त्यामुळे या विमानतळाला जोडणाऱ्या रस्त्यांचे तातडीने काम सुरू करावे. तसेच विमानतळालगतच्या १६ एकर जागेवर डेव्हलपमेंट करण्यात येणार आहे. >या ठिकाणची कामे महानगर पालिका, एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी, एअरफोर्स यांनी समन्वयाने सुरू करावीत. या तिन्ही विभागांनी आपला अ‍ॅक्शन प्लॅन तयार करून कमीत कमी वेळेत काम पूर्ण करावे. या कामात कोणतेही अडथळे येत असतील, तर तातडीने ते सोडविण्यावर भर द्यावा.