शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

स्टार्टअप नसणाऱ्या तालुक्यांकडे विशेष लक्ष देणार, मंगलप्रभात लोढा यांची विधान परिषदेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 11:47 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे राज्याला नवे स्टार्टअप धोरण मिळणार आहे...

मुंबई : ग्रामीण भागात स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी ‘स्टार्टअप नेक्स्ट डोअर’ योजना सुरू करणार आहे. या माध्यमातून १ लाख नवे स्टार्टअप सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच ज्या तालुक्यात एकही स्टार्टअप नाही तिथे विशेष लक्ष दिले जाईल, असे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत २६० अन्वये उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना सांगितले.  रायगड जिल्ह्यात महाडमध्ये बारा बलुतेदारांसाठी ‘विश्वकर्मा भवन’ सुरू करणार असल्याची त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे राज्याला नवे स्टार्टअप धोरण मिळणार आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळे नमो रोजगार मेळावे, युवा कार्य प्रशिक्षण योजना, कौशल्य विकास केंद्र, महिला उद्योजकांना आर्थिक सहाय्य, विदेशात युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे यासारखे अनेक प्रकल्प राबवता आले. त्यांचा लाडका मंत्री कोण हे ते ठरवतील. पण कौशल्य विकास विभाग त्यांचा लाडका विभाग आहे, असे मंत्री लोढा म्हणाले.

आयटीआय सर्वात बेस्टआयटीआयमध्ये नवीन शैक्षणिक धोरण प्रभावीपणे राबविणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. यामुळे विद्यार्थी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक कौशल्ये प्राप्त करीत आहेत विश्वकर्मा भवनमधून परंपरागत व्यवसायांना तंत्रज्ञानाची जोड मिळून रोजगार वाढतील, असे लोढा म्हणाले.

विद्यार्थ्यांना अद्ययावत प्रशिक्षणाची संधी देणारयेत्या वर्षभरात महाराष्ट्रातील १०० आयटीआय संस्था, आस्थापना आणि स्वयंसेवी संस्थांना प्रायोगिक तत्त्वावर दत्तक देण्यात येणार आहे. 

यामुळे उद्योगांसोबत संस्थांचा थेट संबंध निर्माण होऊन विद्यार्थ्यांना अद्ययावत प्रशिक्षणाची संधी मिळेल. तसेच आयटीआयमधील शिक्षकांना नवीन कौशल्यांमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी विशेष ‘ट्रेन द टीचर्स’ भवन स्थापन केले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :businessव्यवसायState Governmentराज्य सरकार