शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

रुग्णांना मतदानासाठी विशेष व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 23:25 IST

जिल्हाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती : राज्यातील पहिलाच प्रयोग रायगडमध्ये राबवणार

अलिबाग : मतदान करणे हा लोकशाहीतील सर्वाेच्च अधिकार आहे. त्यामुळे मतदानापासून कोणीच वंचित राहू नये, यासाठी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नामी शक्कल लढवली आहे. रुग्णालयातील रुग्णांनाच थेट मतदान करता यावे, यासाठी त्यांनी रुग्णांची विशेष व्यवस्था केली आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

विधानसभा निवडणुकीच्या आढाव्याबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात बोलवलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  निवडणूक कामासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी च्निवडणुकीच्या कामासाठी तब्बल १२ हजार ६९७ अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये सात हजार ४३३ पुरुष आणि पाच हजार २६४ महिलांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे एक हजार ९०५ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. ४१ भरारी पथकांची स्थापनाही केली आहे. ३०१३ मतदान युनिट आणि तेवढेच मतदान यंत्र, ३४५० व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध झाले आहेत.रुग्णांसाठी विशेष सुविधा१रुग्णालयामध्ये उपचार घेणाºया रुग्णांना मतदान करता येत नाही. या पुढे त्यांना मतदान करता यावे, यासाठी रुग्णांना विशेष वाहनाने मतदानकेंद्रावर नेण्यात येणार आहे.२जे रुग्ण मतदानासाठी येण्याच्या स्थितीत आहेत त्यांचाच समावेश आहे, असेही सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. जिल्हा सरकारी रुग्णालय, सर्व उपजिल्हा रुग्णालय, कुटीर रुग्णालयांतील रुग्णांना मतदान करता यावे, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.३तसेच खासगी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाशीही संपर्क साधण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.वॉके थॉनचे आयोजन१९ आॅक्टोबर रोजी वॉकथॉन आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये ‘रायगडकर वोटकर’ हे स्लोगन वापरण्यात येणार आहे. जास्तीत जास्त संख्येने मतदान करणाºया कंपन्यातील कामगार, बचतगट, महाविद्यालयातील विद्यार्थी मतदान करतील त्यांच्या आस्थापनांच्या प्रमुखांचा २६ जानेवारी रोजी सत्कार करण्यात येणार आहे.आवश्यक कागदपत्रेच्मतदान करण्यासाठी मतदान ओळखपत्र यासह पासपोर्ट, वाहनचालक परवाना, पॅन कार्ड, आधार कार्ड, छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळख पत्र (केंद्र, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्या. कंपनीने दिलेले ओळख पत्र), मनरेगा कार्यपत्रिका (जॉब कार्ड), एनपीआर अतंर्गत आरसीआयद्वारे दिलेले स्मार्ट कार्ड, कामगार मंत्रालयाद्वारे दिलेले आरोग्य विमा स्मार्ट, छायाचित्र असलेले निवृत्ती वेतन कार्ड, खासदार, आमदार विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र हे पुरावे ग्राह्य धरले जातील. मतदान करण्यासाठी येताना प्रत्येक मतदारांने मतदार चिठ्ठी (व्होटर स्लीप) घेऊन येणे आवश्यक आहे. मतदार चिठ्ठी म्हणजे ओळखपत्र समजू नये.

टॅग्स :Raigadरायगडalibag-acअलिबाग