शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आठ किलोमीटर लांब, जंगलातील पुलाखालीच मिळते इंटरनेट, विद्यार्थ्याचे थेट पंतप्रधानांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 08:31 IST

ऑनलाइन शिक्षणासाठी दररोज आठ किलोमीटर पायपीट; इंटरनेट कव्हरेज मिळण्यासाठी थेट पंतप्रधानांना लिहिले पत्र

- मच्छिंद्र देशमुखलोकमत न्यूज नेटवर्ककोतूळ : अकोले तालुक्यातील अतिदुर्गम फोपसंडी गावातील तेरा वर्षांच्या तुषार मुठेची गावापासून आठ किलोमीटर दूर रस्त्यावर असलेल्या पुलाखालील मोकळ्या जागेत दररोज ऑनलाइन  शाळा भरते. आजूबाजूला  हिंस्त्र श्वापदे असल्याने येथे पालकांना पहारा द्यावा लागतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या शाळेचे दुसरे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. गावात मोबाइलला नेटवर्क नसल्यामुळे दररोज आठ किलोमीटरची पायपीट तुषार व त्याच्या वडिलांना करावी लागते. 

अकोले तालुक्यातील दुर्गम आदिवासी  फोपसंडी गावातील तेरा वर्षांचा तुषार दत्तू मुठे हा सातवीत आदिवासी शासकीय योजनेतून तालुक्यातील वीरगावच्या आनंद दिघे इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये शिकतोय. कोरोनामुळे शिक्षण ऑनलाइन सुरू असल्याने अभ्यास कसा करायचा, हा प्रश्न तुषारला निर्माण झाला. 

वडिलांनी मोलमजुरी करून एक लॅपटॉप घेऊन दिला. पण, गावात इंटरनेटसाठी नेटवर्क नाही. तुषारने ३ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत  पत्र लिहिले. तुषार सध्या गावापासून आठ किलोमीटर दूर सातेवाडी परिसरातील एका दरीत डांबरी रस्त्याच्या छोट्या पुलाखालील जागेत रेंज येत असल्याने दररोज सकाळी आठ ते बारापर्यंत लॅपटॉपवर आपले शिक्षण घेतो. आसपासच्या परिसरात रानडुकरे, तरस, बिबटे असे प्राणी असल्याने पालकांना शाळा संपेपर्यंत पहारा द्यावा लागतो. 

मला दररोज मुलाला घेऊन जावे लागते. तेथे दोन ते तीन तास थांबावे लागते. मुलगा इथेच शिकतो आणि गृहपाठही इथूनच करतो.    गावात मोबाइल रेंज आली तर बरे होईल.     - दत्तू मुठे, तुषारचे वडील    

मला शिकायचं आहे. होमवर्क व क्लास इथूनच करावे लागतात.  त्यात कधी रेंज गेली किंवा कमी झाली तर तास बुडतो. मी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. ते नक्की आमच्या गावात रेंज आणतील.      - तुषार मुठे, विद्यार्थी 

२० वर्षांपूर्वी आली गावात वीज फोपसंडी अकोले तालुक्यातील अत्यंत दुर्गम गाव. येथे २० वर्षांपूर्वी तत्कालीन आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांच्यामुळे वीज आली व रस्ता झाला. सध्या या गावाच्या दहा चौरस किलोमीटर क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे इंटरनेट नेटवर्क नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याInternetइंटरनेटNarendra Modiनरेंद्र मोदी