शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

लाखावर सोयाबीन उत्पादक शेतकरी मदतीविना !

By admin | Updated: August 18, 2016 18:37 IST

कृषी आणि महसूल विभागाच्या उदासिनतेचा फटका जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.

गणेश मापारी खामगाव, (जि.बुलडाणा) - कृषी आणि महसूल विभागाच्या उदासिनतेचा फटका जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. गेल्यावर्षी खरिप हंगामामध्ये सोयाबीनचा पेरा केलेल्या मात्र पीक विमा न काढलेल्या शेतकऱ्यांची माहिती सहा महिन्यांपासून जुळलेली नाही. त्यामुळे लाखाहून अधिक सोयाबीन उत्पादक शेतकरी मदतीपासून वंचित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गत तीन-चार वर्षांपासून शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. शासनाकडून ठोस अशी काहीही मदत न मिळाल्यामुळे पीक विमा योजनेने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा दिला आहे. मात्र पीक विमा न काढलेल्या शेतकऱ्यांकडे पेरणीची सुध्दा सोय नाही ही बाब हेरुन शासनाने औरंगाबाद, नाशिक, नागपूर व अमरावती या चार विभागातील कापूस, सोयाबीन आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय फेब्रुवारी २०१६ मध्ये घेतला. औरंगाबाद आणि नाशिक विभागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तर अमरावती व नागपूर विभागातील सोयाबीन आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याची योजना शासनाने आखली. पीक विमा न काढलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याच्या निम्मे रक्कम मदत म्हणून देण्यासाठी या चारही विभागातील कापूस, सोयाबीन व धान उत्पादक शेतकऱ्यांची माहिती मागविण्यात आली.

बुलडाणा जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक व पीक विमा न काढलेल्या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. त्यामुळे प्रशासनाने पीक विमा न काढलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची माहिती शासनाला देणे अपेक्षित होते. मात्र महसूल व कृषी विभागाकडून अद्याप पर्यंतही जिल्ह्यातील पीक विमा न काढलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची माहिती शासनाला गेलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील लाखावर शेतकरी शासकीय मदतपासून वंचित आहेत. महसूल व कृषी विभागाची उदासिनताच या प्रकारासाठी कारणीभूत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.अशा प्रकारे होत आहे माहितीचे संकलनमहसूल विभागाकडे शेतकऱ्यांची आकडेवारी आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांची संख्या नमूना ८-अ वरुन काढण्यात येत आहे. ही संख्या कृषी विभागाला देण्यात आली आहे. कृषी विभागाने बँकांकडून गतवर्षी खरिपाचा पीक विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांची माहिती घेतली आहे. तसेच सोयाबीनचा पेरा केलेल्या शेतकऱ्यांची माहिती या दोन्ही विभागाकडे आहे. ही सर्व माहिती एकत्रित करुन सोयाबीन उत्पादक व पीक विमा न काढलेल्या शेतकऱ्यांची माहिती संकलीत करण्यात येत आहे. तथापी सर्वत्र डिजीटलचा बोलबाला असताना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या जुळविण्यासाठी कृषी व महसूल विभागाला करावा लागणारा आटापिटा हा चर्चेचा विषय आहे. ७० हजार शेतकऱ्यांनी उतरविला नाही विमा४ सन २०१० च्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात ४ लाख ३० हजार शेतकरी असल्याची नोंद आहे. गत वर्षी ३ लक्ष ६३ हजार २४६ शेतकऱ्यांनी खरिपाचा पीक विमा उतरविलेला आहे. त्यामुळे जवळपास ७० हजार शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविलेला नाही. यापैकी बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनचाच पेरा केलेला आहे. परिणामी या आकडेवारीनुसार सोयाबीन उत्पादक असे ५० हजारावर शेतकरी असण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पीक विम्यासाठी अपात्र ठरलेल्या ८६ हजार शेतकऱ्यांमध्येही सोयाबीनचा पेरा केलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १ लाखाच्यावर सोयाबीन उत्पादक शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.त्या ८६ हजार शेतकऱ्यांना मिळावा लाभ४गत वर्षी खरिपाचा पीक विमा न उतरविलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची ही योजना आहे. जिल्ह्यातील ३ लक्ष ६३ हजार २४६ शेतकऱ्यांनी गेल्यावर्षी पीक विमा उतरविला आहे. यापैकी ८६ हजार ३३८ शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. अपात्र ठरविण्यात आलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची मदत मिळालेली नाही. तर पीक विमा न उतरविलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याची योजना शासनाने आखली आहे. त्यामुळे पीक विमा काढून विम्यासाठी अपात्र ठरविण्यात आलेल्या शेतकऱ्यांना या योजनेतून मदत देण्यात यावी अशी मागणी पुढे आली आहे.

२५ आॅगस्टची डेडलाईनसोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची माहिती जुळविण्यासाठी कृषी व महसूल विभागाच्या अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप पर्यंत एकाही तालुक्याची माहिती संकलीत झाली नाही. त्यामुळे सदर माहिती २५ आॅगस्टपर्यंत सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.⁠⁠⁠⁠