शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

मुलगा १२ वीत पहिला आला; आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या बापाचा काळाने घात केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 14:41 IST

जामनेरपासून काही अंतरावर शहापूरनजीक हा अपघात झाला. त्यात आनंदा भीमराव जगताप यांचा जागीच मृत्यू झाला.

जळगाव - गुरुवारी बारावीचा निकाल लागल्याने उत्तीर्ण झालेल्या मुलांच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. मात्र जळगावात घडलेल्या एका दुर्घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. याठिकाणी जामनेर-शहापूर रस्त्यावर मॅजिक गाडी झाडाला आदळून अपघात झाला. त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर १ जण गंभीर जखमी झाला. 

जामनेरपासून काही अंतरावर शहापूरनजीक हा अपघात झाला. त्यात आनंदा भीमराव जगताप यांचा जागीच मृत्यू झाला. तर दीपक शेळके हा गंभीर झाल्याची माहिती आहे. जखमीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून अपघाताची माहिती घेतली. त्यानंतर मृत आनंदा जगताप यांचा मृतदेह पोस्टमोर्टम रिपोर्टसाठी पाठवण्यात आला. 

आनंदावर विरजण पडलंगुरुवारी दुपारी १२ वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागला होता. त्यात मृत आनंदा जगताप यांच्या मुलाने शाळेत पहिला क्रमांक पटकावला. मुलाचा आनंद साजरा करण्यासाठी आनंदा घरी जात होते. पण वाटेतच काळाने घात केला. मुलगा बारावी पास झाला यासाठी कुटुंबात उत्साह होता. परंतु घरातील कर्ता पुरुष अपघातात गेल्याची बातमी कळताच कुटुंबाला धक्का बसला. या बातमीने गावकरीही हळहळले. 

अपघाताची चौकशीसध्या पोलिसांनी या अपघाताची नोंद केली असून अपघात नेमका कशामुळे झाला याचा पोलीस तपास करत आहेत.  

टॅग्स :Accidentअपघात