शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत जेजुरीत पारंपारिक धार्मिक विधींसह सोमवती यात्रा संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 10:16 IST

येळकोट येळकोट जय मल्हार चा गजर करत राज्यभरातून सोमवती अमावस्येला जेजुरी येथे लाखो भाविक येत असतात.

ठळक मुद्देमहापूजा, अभिषेकासह इतर धार्मिक विधी संपन्न

बाळासाहेब काळेजेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबारायाची जेजुरी येथे सालाबादप्रमाणे होणारी सोमवती अमावस्येची यात्रा आज (दि. २०)पार पाडली. मात्र दरवर्षीप्रमाणे यावेळी जास्त गर्दी नव्हती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने धार्मिक विधिवत पद्धतीने मोजक्याच प्रमुख लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा जेजुरी गडावर संपन्न झाला.   कोविड 19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभर मंदिरे बंद असल्याने सर्वत्र सण उत्सव मोजक्याच पुजारी सेवकांच्या उपस्थितीत पार पडत आहेत. तीर्थक्षेत्र जेजुरीतही आजची सोमवती यात्रा पारंपरिक पद्धतीने पार पडली.  सोमवती यात्रा असल्याने राज्यभरातून लाखो भाविक आले असते. मात्र, लॉकडाऊन आणि कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी प्रशासनाने गर्दी टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. जेजुरीत सोमवती यात्रा असूनही प्रशासनाने लाखो भाविकांच्या उपस्थितीत निघणाऱ्या पालखी सोहळ्याला परवानगी नाकारली आहे.  यामुळे  मुख्य मानकरी पेशव्यांच्या उपस्थितीत मार्तंड देवसंस्थान, देवाचे पुजारी सेवक, खांदेकरी मानकरी व ग्रामस्थांनी सोमवती अमावस्येचे धार्मिक विधी मंदिरातच मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत करण्याचा निर्णय घेतला होता. तरीही गर्दी होण्याची शक्यता असल्याने पहाटेच यात्रेचे धार्मिक विधी मोजक्याच पुजारी मानकरी, सेवकांच्या उपस्थितीत कर्हा नदीचे पाणी गडावर आणून उत्सवमूर्तींना स्नान घालण्यात आले, महापूजा,अभिषेक, धार्मिक विधी उरकण्यात आले. मुख्य गाभाऱ्यात फुलांची सजावट करण्यात आली होती. रोजमारा वाटप करून यात्रेची सांगता करण्यात आली.

टॅग्स :JejuriजेजुरीKhandoba Yatraखंडोबा यात्राcorona virusकोरोना वायरस बातम्याState Governmentराज्य सरकारNavalkishor Ramनवलकिशोर राम