शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

वीजदरवाढीवर तोडगा निघणार !

By admin | Updated: March 14, 2015 05:38 IST

राज्यातील वीजग्राहक, उद्योजक आणि यंत्रमागधारकांचे वीजदर नियंत्रित ठेवणे हे केवळ ग्राहकांच्या हिताचे नाही, तर राज्याच्या विकासाच्या दृष्टीनेही

मुंबई : राज्यातील वीजग्राहक, उद्योजक आणि यंत्रमागधारकांचे वीजदर नियंत्रित ठेवणे हे केवळ ग्राहकांच्या हिताचे नाही, तर राज्याच्या विकासाच्या दृष्टीनेही आवश्यक आहे. त्यामुळे या प्रश्नी येत्या मंगळवारपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू, प्रसंगी बैठक बोलावू आणि मार्ग काढून अंतिम निर्णय घडवून आणू, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वीजग्राहक व औद्योगिक संघटना राज्यस्तरीय समन्वय समितीसह महाराष्ट्र राज्य बुनकर फेडरेशनच्या शिष्टमंडळाला दिले.राज्यातील वीजदरवाढ प्रश्नावर वीजग्राहक व औद्योगिक संघटना राज्यस्तरीय समन्वय समिती आणि महाराष्ट्र राज्य बुनकर फेडरेशनच्या शिष्टमंडळाची शिवसेना भवनात शुक्रवारी बैठक झाली. समन्वय समितीचे निमंत्रक प्रताप होगाडे, बुनकर फेडरेशनचे अध्यक्ष फैजान आझमी, महाराष्ट्र चेंबरचे अनिल गचके आणि अन्य विविध उद्योजक व यंत्रमागधारक संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. बैठकीदरम्यान जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी शिष्टमंडळाचे विजेबाबतचे प्रश्न समजावून घेत त्यांच्याशी चर्चा केली.राज्यातील वीज घोटाळा हा सिंचन घोटाळ्यापेक्षा अधिक मोठा आणि गंभीर आहे. अकार्यक्षमता, अवाढव्य भांडवली खर्च, प्रचंड वितरण गळती आणि भ्रष्टाचारामुळे स्थिती गंभीर बनली आहे. वीजदरवाढीमुळे कोल्हापूर, सांगली, ठाणे, नागपूर, चंद्रपूर येथील उद्योजक कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांत स्थलांतरित होत आहेत. यावर मार्ग काढण्यात आला नाही तर राज्याचे नुकसान होईल, आदी बाबी शिष्टमंडळाने बैठकीदरम्यान निदर्शनास आणून दिल्या. यावर शिवसेनेकडून वीजप्रश्नी तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. दरम्यान, राज्य सरकारची भूमिका सकारात्मक आहे. तथापि अंतिम व स्पष्ट निर्णय होत नसल्याने उद्योजक व यंत्रमागधारकांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे सुरू असलेल्या राज्यस्तरीय आंदोलनाची माहिती या वेळी प्रताप होगाडे यांनी दिली. शिवाय तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)