शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीकरांच्या मदतीसाठी धावले सोलापूरकर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 12:46 IST

ट्रकमध्ये बोटी घेऊन पोहोचले अन् सुरक्षित काढले पूरग्रस्तांना

ठळक मुद्देकृष्णेला आलेल्या पुरामुळे अवघं जीणं जलमय झालेल्या सांगलीकरांना मदतीची गरजसततच्या पावसामुळे सांगलीला कृष्णा अन् कोयनेच्या पाण्याने वेढा सोलापूर जिल्ह्यातून गेलेल्या पथकाने अतिशय नियोजनबध्द पध्दतीने काम सुरू केले

सोलापूर : कृष्णेला आलेल्या पुरामुळे अवघं जीणं जलमय झालेल्या सांगलीकरांना मदतीची गरज होती..ते जगणं असं झालंय की, मदतीची हाक देण्याचे त्राण कुणात नाहीत..पाण्याशी संघर्ष करण्यातच सांगलीकरांचा दिवस अन् रात्र जातेय..सर्वत्र दिसणाºया अन् अथांग पसरलेल्या पाण्याने भयभीत झालेल्या महिला, मुलं अन् रूग्णशय्येवर पडलेल्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याचं तर मोठं आव्हानच होतं..संकटात सापडलेल्यांच्या मदतीसाठी आपला हात पुढं करणं हा तर सोलापूरकरांचा धर्म हा धर्म सोलापूर जिल्ह्यातील युवकांनी विशेषत: मच्छिमारांनी मोठ्या निष्ठेने पाळला अन् सांगलीकरांचे जीवन सुसह्य करण्यात स्वत:त तन - मन - धन अर्पण केलं.

सततच्या पावसामुळे सांगलीला कृष्णा अन् कोयनेच्या पाण्याने वेढा दिला आहे. चौक, गल्ला तर सोडाच अगदी छोट्या बोळातही पाणी शिरलं...घरं पाण्यात गेली. या पुरात जीवन सुरक्षित करणं,हाच सध्या सांगलीकरांचा ध्यास आहे. या स्थितीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर तसेच जिल्हा प्रशासनाने आवाहन केले अन् करमाळा तालुक्यातील मच्छिमारीचा व्यवसाय करणारे युवक स्वत:च्या होड्यांसह सज्ज झाले. 

करमाळा तालुक्यातील चिखलठाण, केत्तूर, टाकळी,  कंदर, कोंढारवाडी, रामवाडी गावातील मच्छिमारांनी आपल्या होड्या ट्रकमध्ये भरल्या अन् थेट सांगली गाठली...एकवीसजणांचे पथक आज सकाळपासून लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी होड्यांसह पाण्यात उतरले. सांगलीचे उपजिल्हाधिकारी मिनाज मुल्ला हे पूर्वी करमाळयाचे मुख्याधिकारी होते. त्यांनी या पथकाला कुठल्या भागातून कुणाला कुठे सुरक्षित हलवायचे, याचे मार्गदर्शन केले. पूरग्रस्त मुलं, महिला अन् आजारी व्यक्तींना प्राधान्य देत, त्यांना सुरक्षितस्थळी हलविले...जोपर्यंत प्रत्येक सांगलीकर सुरक्षित होत नाही. तोपर्यंत थांबायचं नाही, असा या मच्छिमारांनी निर्धार व्यक्त केलायं.-११४ लोकांना सुरक्षित हलविलेसोलापूर जिल्ह्यातून गेलेल्या पथकाने अतिशय नियोजनबध्द पध्दतीने काम सुरू केले आहे. आज पहाटे सांगली पोहोचल्यानंतर त्यांनी वेगळवेगळ्या भागातील पूरस्थितीचे निरीक्षण केले. उपजिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची कुठे गरज आहे. त्या भागांचा प्राधान्यक्रम ठरविला अन् मोहीम सुरू केली. सकाळपासून ११४ जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :SolapurसोलापूरSangli Floodसांगली पूरwater transportजलवाहतूक