शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

Solapur Election - सोलापुरात दिग्गजांचा सुपडा साफ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2017 18:41 IST

जिल्हा परिषद निवडणुकीतही राष्ट्रवादीला जबरदस्त धक्का देण्याची व्यूहरचना जिल्ह्यातील तरुण तुर्कांच्या मदतीने भाजपने आखली होती

राजा माने

सोलापूर, दि. 23 - १९६२ पासूनच्या काँग्रेस बालेकिल्ल्यास भुईसपाट करीत भाजपने अनेक दिग्गजांचे महापालिका निवडणुकीत सुपडा साफ केला. विद्यमान महापौर, उपमहापौर आणि अनेक माजी महापौरांबरोबरच काँग्रेससह राष्ट्रवादी व कॉ. आडम मास्तर यांच्या माकपलाही जबरदस्त धक्का दिला. जिल्हा परिषद निवडणुकीतही राष्ट्रवादीला जबरदस्त धक्का देण्याची व्यूहरचना जिल्ह्यातील तरुण तुर्कांच्या मदतीने भाजपने आखली होती. परंतु ती मोहीम मात्र राष्ट्रवादी पक्षाने ग्रामीण भागात काही अंशाने रोखली आहे.

१०२ जागांच्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपचे सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि भाजपच्या थिंक टँकने केलेली मोर्चेबांधणी जबरदस्त यशस्वी झाल्याची प्रचिती निवडणूक निकालाने आज दिली. काँग्रेसची भिस्त सुशीलकुमार शिंदे व त्यांच्या आमदार कन्या प्रणिती यांच्यावरच होती. त्यांनी शहरात राबविलेल्या प्रचार मोहिमेला सोलापूरकरांनी साफ नाकारले आणि काँग्रेसला केवळ १४ जागांवर शांत बसावे लागले. याउलट एमआयएमसारख्या पक्षाने तब्बल ९ जागा जिंकत आपले अस्तित्व नव्याने निर्माण केले. भाजपच्या दोन देशमुखांमधील तथाकथित वादांचाही या निवडणुकीवर काडीचाही परिणाम झाला नाही आणि भाजपने निर्विवादपणे ४९ जागा खिशात टाकल्या.

महापालिकेच्या सत्ताकारणात दीर्घकाळ स्व. तात्या तथा विष्णुपंत कोठे यांची प्रमुख भूमिका राहिली होती. तीच भूमिका वठविण्याच्या इराद्याने त्यांचे चिरंजीव महेश कोठे यांनी शिवसेनेचा झेंडा हातात घेऊन तब्बल २१ जागा सेनेच्या खात्यात जमा केल्या. राष्ट्रवादीचे सर्व नेते तर या निवडणुकीत पराभूत झालेच झाले; पण त्यांचे संख्याबळही केवळ ४ वर येऊन ठेपले. बसपाने चार जागा सुरक्षित केल्या. एकूणच एका ऐतिहासिक विजयाची नोंद करताना भाजपच्या सुभाषबापू व मालकांनी महापालिकेत जबरदस्त ‘दे धक्का’ मोहीम यशस्वी केली.

बार्शीच्या राजेंद्र राऊत यांच्यासह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील नेत्यांनी यशस्वी गळ लावण्याचा प्रयोग भाजपने जि.प.-पंचायत समिती निवडणुकीत केला. तो काहीअंशी यशस्वीही झाला. प्रत्येक तालुक्यातील काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रस्थापित नेत्यांच्या विरोधातील आघाड्यांना आपलेसे करण्याची भूमिका भाजपने घेतली होती. तरीही स्वत:च्या कमळ चिन्हावर १५ सदस्य जिल्हा परिषदेत धाडण्यात भाजपला यश मिळाले. खा. विजयसिंह मोहिते-पाटील, त्यांचे चिरंजीव रणजितसिंह व पुतणे धैर्यशील यांनी मात्र माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादीच्या गडावरील हल्ल्यांना परतवून लावण्यात यश मिळविले आहे. ११ पैकी ८ जागांवर राष्ट्रवादीचे सदस्य निवडून आणण्याची किमया मोहिते-पाटलांनी केली.

६८ सदस्य संख्या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने २३, भाजपने १५ तर स्थानिक आघाड्यांनी २३ तर काँग्रेसने केवळ ६ सदस्य निवडून आणण्यात यश मिळविले आहे. देशाचे नेते शरद पवार, राज्याचे नेते अजित पवार आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नावांवर राजकीय दुकान चालविणारे जिल्ह्यातील अनेक नेते राष्ट्रवादी पक्षाच्या जि.प.तील २३ जागांचा वापर कसा करणार, जिल्ह्यातील तरुण तुर्क नेते आता कोणती व्यूहरचना करणार आणि भाजप नेते सुभाष देशमुख व विजयकुमार देशमुख राजकारणाचा डाव कसा मांडणार, यावरच राष्ट्रवादीच्या जि.प.वरील सत्तेचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.