शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

सॉक्रेटिस ते दाभोलकर, पानसरे व्हाया तुकाराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 01:39 IST

देशाच्या संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा एक मूलभूत अधिकार बहाल केला आहे, त्यावर रोख लावणारे तुम्ही कोण? असा प्रश्न खरे तर प्रत्येक सामान्य नागरिकांना पडायला हवाय.

दिवसागणिक किड्या-मुंग्यांसारखी माणसे मरतात, त्याचे काय? असे प्रश्न विचारणाऱ्या राज्यकर्त्यांच्या एका असंवेदनशील समाजात आपण राहत आहोत. देशाच्या संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा एक मूलभूत अधिकार बहाल केला आहे, त्यावर रोख लावणारे तुम्ही कोण? असा प्रश्न खरे तर प्रत्येक सामान्य नागरिकांना पडायला हवाय. पण असे प्रश्न कुणाच्या मनात निर्माणच होत नाहीत कारण प्रत्येक जण कुठल्या ना एका अनामिक दडपणाखाली वावरत आहे. एक प्रकारचे अंधकारमय वातावरण आहे, एक कमालीची अस्वस्थता पसरली आहे. परंतु ही परिस्थिती आजची आहे का? तर नाही! ज्यांनी प्रथा, धर्म, व्यवस्थेमधील चुकीच्या गोष्टींवर प्रहार केला. त्यांना प्राणाची किंमत मोजावीच लागली आहे. आजच्या एकविसाव्या शतकातही परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. ज्यांनी धर्माची चिकित्सा मांडणी करीत धर्म अभ्यासकांसमोर काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले, त्यांच्याशी वैचारिक लढा न देता बंदुकीच्या गोळ्यांमधून त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले. कालबाहय विचारांवर फुली मारत बदलत्या काळाशी सुसंगत मांडणी केली त्यांचाच आवाज दाबण्यात आला. परिवर्तनाची पताका आयुष्यभर हाती घेत विवेकी विचार रुजविणाºया डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंदराव पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांसारख्या विचारवंतांना संपविण्यात आले. भरदिवसा या विचारवंतांचे खून झाले, पण त्याचा छडा लावण्यात पोलीस यंत्रणा आणि शासन कुचकामी ठरले. हे सगळं होत असताना एक नागरिक आणि कलावंत म्हणून आपली जबाबदारी नक्की काय? असा प्रश्न नाटककार अतुल पेठे यांना भेडसावू लागला. मात्र त्यांच्यासमोर अभिव्यक्तीचा एकमेव मार्ग होता तो म्हणजे ‘नाटक’! यातूनच पुरोगामी विचारांची एक लढाई सुरू झाली. व्यक्ती गेल्या तरी त्यांचे विचार संपत नाहीत हा एक विचार रुजविण्याचा प्रयत्न झाला तो ‘रिंगण’नाट्यातून. निषेधाला माध्यम मिळाले आणि विवेकशील विचारांची एक फळी युवकांमध्ये निर्माण होण्यास मदत झाली.याविषयी ‘लोकमत’शी अतुल पेठे म्हणाले, की डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर एक जबाबदार नागरिक, कलावंत म्हणून मी हादरलो होतो. त्यांचे विचार मला माहिती होते. त्यांच्याबरोबर हिंडण्याची आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळाली होती. त्यांचे विचार मला परिचित होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता नव्हतो पण त्याचा पुरस्कर्ता मात्र नक्की होतो. समाजातील अंधश्रद्धा दूर झाल्या पाहिजेत हा महत्त्वाचा मुद्दा होता. संविधानाचा आधार घेऊन लोकशाही परंपरेमध्ये आपल्याच अनेक गोष्टींना धर्म, रूढींना प्रश्न विचारू शकतो. ते विचारले तर चुकीच्या रूढी नष्ट होतात. प्रश्न विचारल्यामुळे समाजजीवन पुढे जातो हा दाभोलकरांचा विचार मला पटला. शास्त्रीय दृष्टिकोन बाळगत नाही तोवर सामाजिक आणि वैचारिक दारिद्र्य दूर करू शकत नाही. पण दाभोलकर देवधर्माच्याविरोधात आहेत, असा अपप्रचार केला गेला. त्यांचा खून झाला तेव्हा राजू इनामदार यांच्या सहकार्याने ‘रिंगण’नाट्याचा जन्म झाला. मी नाटकवाला असल्याने नाटकाच्या माध्यमातून अंधश्रद्धेची चार सूत्रे घेऊन जाऊ शकतो आणि मित्राच्या खुनाचा विधायक मार्गाने निषेध नोंदवू शकतो.

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकर