शहरं
Join us  
Trending Stories
1
असले नालायक लोक माझ्या पक्षात नको; पळून पळून जाणार कुठं? दोषींवर कारवाई होणार - अजित पवार
2
"सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा...’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा 
3
अमेरिकेने जगातील सर्वात शक्तिशाली अणु क्षेपणास्त्राची चाचणी केली; काही मिनिटांत शत्रूचा नाश करणार
4
माझ्या नसांमध्ये रक्त नाही, गरम सिंदूर...आता फक्त PoK..; पीएम मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा
5
"नणंद आणि दिराने चारित्र्यावर संशय घेतला, तर सासऱ्यांनी…’’ हगवणे यांच्या थोरल्या सुनेने केले गंभीर आरोप 
6
बचपन का प्यार! बायको-पोरांना सोडून बालपणीच्या मैत्रिणीसोबत फुर्र झाला ६० वर्षांचा वकील; पण २४ तासांतच..
7
बापरे! 'या' लोकांसाठी पाणी ठरतंय विष; जास्त पिणं ठरू शकतं जीवघेणं
8
१५ कोटींचे टार्गेट होते...! खोतकरांची ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी; धुळे विश्रामगृहातील पैशांवर राऊतांचा मोठा दावा
9
पावसाळ्यात फिरायला जायचंय? बजेटची चिंता सोडा! 'ट्रॅव्हल लोन'ची ही प्रक्रिया फक्त माहिती हवी
10
वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे इंग्लंडला जाणार! विराट-रोहितच्या कसोटी निवृत्तीनंतर BCCIची मोठी घोषणा
11
फोन आला अन् बाणेर हायवेवर अज्ञाताने वैष्णवीचे बाळ दिले; कुटुंबीयांची माहिती, आजोबा म्हणाले 'आयुष्यभर सांभाळू...'
12
घरातील सर्वांचा विरोध; तरीही वैष्णवीचा लव मॅरेजसाठी हट्ट, मामाने सगळा घटनाक्रम सांगितला..
13
पाकिस्तानी लष्करप्रमुख धार्मिक कट्टर..; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केली आसिम मुनीरची पोलखोल
14
आरोग्य विमा ३० वर्षांचे होण्याआधीच घ्या, नाहीतर 'महाग' पडेल! जाणून घ्या ७ मोठे फायदे
15
Apara Ekadashi 2025: एकादशीचा उपास निरोगी आयुष्य देणारा; फक्त त्यादिवशी 'हा' पदार्थ टाळा!
16
“आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला, आता राज ठाकरेंनी निर्णय घ्यावा”; ठाकरे गटाचे नेते थेट बोलले
17
"लडकियों को में भी देखता हूं, इतना क्या...", अभिनेत्रीकडे एकटक बघत होता, जाब विचारल्यावर म्हणाला...
18
हृदयद्रावक! भावाच्या जीवाची भीक मागत होती बहीण; पण कोणीच केली नाही मदत, झाली हत्या
19
विमानावर वीज पडली तर काय होते? इंडिगोच्या विमानाने भरवली धडकी, जाणून घ्या किती सुरक्षित...
20
Kishtwar Terrorist Encounter : काश्मीरमधील किश्तवाड येथील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, दोघांना लष्कराने घेरले 

तृतीयपंथीयांचे जग उद्ध्वस्त करणारा समाज खलनायक

By admin | Updated: June 11, 2016 00:58 IST

साहित्यात दलित साहित्याचा पूर आला होता, भटके, आदिवासींचे साहित्य निर्माण झाले.

पुणे : साहित्यात दलित साहित्याचा पूर आला होता, भटके, आदिवासींचे साहित्य निर्माण झाले. परंतु तृतीयपंथीयांविषयी साहित्य निर्माण झाले नाही. तृतीयपंथीयांना स्वत:लाच स्वत:विषयी लिहावे लागते, समाजाला सांगावे लागते, ही दुर्दैैवी बाब आहे. तृतीय पंथ हे प्राकृतिक सत्य म्हणून आपण स्वीकारले पाहिजे, स्त्रियांचा जन्म नाकारणारा समाज नालायक आहे तर तृतीय पंथीयांचे जग उद्ध्वस्त करणारा समाज खलनायक आहे, तृतीयपंथीयांना न्याय देण्यात सरकारचा पुरुषार्थ असायला हवा, असे परखड विचार ज्येष्ठ समीक्षक आणि संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.सूर्यकांत तिवडे लिखित ‘तृतीयपुरुषी शून्य वचनी’ या कादंबरीच्या प्रकाशनाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते सदानंद शेट्टी, किन्नर समाजासाठी काम करणारे सलमा खान, ज्येष्ठ समीक्षक डॉ. मनोहर जाधव, मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, लेखक सूर्यकांत तिवडे व प्रमोद आडकर उपस्थित होते. आभार आनंद पायाळ यांनी मानले. (प्रतिनिधी)>सबनीस म्हणाले, कादंबरीवरून चित्रपट होणे याला मोठी परंपरा आहे, परंतु ही परंपरा मोडीत काढून सूर्यकांत तिवडे यांनी चित्रपट कथेवरून कादंबरी लिहिण्याचे क्रांतिकारी पाऊल साहित्य क्षेत्रात टाकले आहे. आजपर्यंत कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्तव्य बजावले नाही, साहित्यिकांनी मात्र या समस्येला हात घातला ही आनंदाची बाब आहे. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी जे शेतकऱ्यांसाठी काम केले ते सरकारला शक्य झाले नाही. स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी करणारी भारतीय राज्यघटना तृतीयपंथीयांच्या बाबतीत पराभूत आहे. तृतीय पंथीयांचे प्रश्न आजतागायत आहे तसेच आहेत. विकृती आणि प्रकृतीच्या व्याख्या मानवी संस्कृतीने ठरविल्या आहेत. या मानवी संस्कृतीचे मूल्यमापन केले गेले पाहिजे. तृतीयपंथीयांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सलमा खान म्हणाल्या, किन्नर समाज दुर्लक्षित आहे, त्यामुळे या समाजाची अत्यंत दुर्गती झाली आहे. किन्नरांना जगण्याचे साधन नाही. समाजाने किन्नरांचा स्वीकार केलेला नाही. त्यांना माणूस मानले जात नाही, हे बदलले पाहिजे.