शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

नावीन्यपूर्ण देखाव्यांमधून सामाजिक संदेश

By admin | Updated: September 10, 2016 02:20 IST

खारघरमध्ये यंदा नावीन्यपूर्ण देखाव्यामधून सामाजिक संदेश देण्याचा उपक्रम सार्वजनिक मंडळांनी राबविला आहे.

वैभव गायकर,

पनवेल- खारघरमध्ये यंदा नावीन्यपूर्ण देखाव्यामधून सामाजिक संदेश देण्याचा उपक्रम सार्वजनिक मंडळांनी राबविला आहे. देखाव्यात मंडळाने महाड दुर्घटना, स्त्रीभ्रूणहत्या आणि रायगड किल्ल्यातील शिवाजी महाराजांचे दरबार तर बहुतांश मंडळाने महलचा देखावा साकारून गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे.अनेक मंडळे आकर्षक रोषणाई, मोठे डेकोरेशन याकडे लक्ष देत असतात. मात्र खारघरमधील मंडळांनी राबविलेला हा हटके उपक्र म असल्याने भक्तदेखील बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी व देखावे पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत.खारघर सेक्टर एकोणीस मधील श्री बालाजी मित्र मंडळाने महाड जवळील सावित्री नदीवरील दुर्घटना, कोसळलेली बस, पूल बेपत्ता प्रवाशांचे एनडीआरएफच्या आणि तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे सुरु असलेला शोधकार्याचा देखावा तयार करून गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. सेक्टर वीस शिल्प चौक मधील श्री गणेशिमत्र मंडळाने बाहेरून रायगड किल्ला आतील तर आत मध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचा दरबार हा देखावा साकारला आहे. किल्ल्यांचे संवर्धन हे यामागचे उद्देश असल्याचे मंडळाचे अध्यक्ष केसरीनाथ पाटील यांनी सांगितले. तर वास्तुविहार सोसायटी मित्र मंडळाने श्रीची आकर्षक मूर्तीची स्थापना उभारून श्रीच्या चाहुबाजूने स्त्रीभ्रूणहत्या संदेश देऊन पहिली महिला डॉक्टर आनंदी जोशीपासून कल्पना चावला, भारतरत्न लता मंगेशकरापासून नुकताच रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक मिळवून देशाचे नाव उज्वल करणाऱ् पी व्ही सिंधू,साक्षी मलिक, दीपा कर्माकर आदी महिलांचे कार्य देशासाठी किती भूषणावह आहे, याविषयी दिलेली माहिती लक्ष वेधून घेत आहे. सेक्टर एकोणीसमधील शेतकरी कामगार पक्ष, श्री समर्थ मित्र मंडळाने श्री च्या पाठीमागील बाजूस पंढरपूर येथील विठ्ठलाचे साकारलेले चित्र आणि गुरु ठाकूर यांचा श्री सिद्धिविनायक उत्सव मित्र मंडळाने राजवाडाचा देखावा उभा केला आहे. खारघर सेक्टर अठरा मधील मधील श्री गणेश मित्र मंडळाने जाणता राजा तर बाप्पा मोरया गणेश मंडळाची आकर्षक मूर्ती लक्ष वेधून घेत आह. खारघर वसाहतीमधील पहिला गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खारघरचा राजा गणेशमंडळांने देशभक्तीचे फलक उभारून मंत्रालयात गरजू रुग्णासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी या नावाने सुरु करण्यात आलेल्या योजनेचे माहिती उपलब्ध करून दिली आहे. सेक्टर पंधरा घरकुल रहिवासी संघाने दरवर्षीप्रमाणे लाल बागचा राजा तर मंगलमूर्ती मंडळ तसेच सेक्टर चारमधील सह्याद्री मित्र मंडळाने बर्फाळ प्रदेशच तर सेक्टर दोन,आठ आणि दहामधील सुखकर्ता मित्र मंडळाने महलचा देखावा तयार केला आहे.