शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजप आमदाराच्या लग्नात सर्व नियम धाब्यावर; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, बडे नेते विनामास्क

By कुणाल गवाणकर | Updated: December 21, 2020 09:25 IST

भाजप आमदार राम सातपुतेंच्या लग्नात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन

पुणे: राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरीही धोका कायम आहे. तरीही अनेक जण बेजबाबदारपणे वागत आहेत. स्वत:ला जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणवून घेणारे लोकप्रतिनिधीदेखील यात मागे नाहीत. याचा प्रत्यय भारतीय जनता पक्षाचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्या लग्न सोहळ्यात आला. या समारंभात सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण फज्जा उडाला. लग्नाला उपस्थित असलेल्या अनेक मोठ्या नेत्यांनी मास्कदेखील घातले नसल्याचं फोटोत दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना 'दो गज की दुरी' राखण्याचं आणि मास्क वापरण्याचं आवाहन करत आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी मास्कशिवाय सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता राज्यातले भाजप नेते लग्न समारंभात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन करताना दिसले. पुण्यात संपन्न झालेल्या राम सातपुतेंच्या सोहळ्याला ५०० हून अधिक जणांची उपस्थिती होती. यामध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा समावेश होता. सातपुतेंच्या विवाह सोहळ्याला पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार नितेश राणे, आमदार गोपीचंद पडळकर, भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि इतर नेते उपस्थित होते. या नेतेमंडळींसह लग्नाला हजर असलेल्या इतरांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं पाहायला मिळालं. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्कदेखील दिसत नव्हते. त्यामुळे आता या प्रकरणी कोणती कारवाई केली जाणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो उपस्थितांनी शेअर केले. यावेळी राम सातपुतेंवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. मात्र अनेकांनी लग्नातील गर्दी पाहून नाराजीही व्यक्त केली. सर्वसामान्यांसाठी लग्नाला केवळ ५० पाहुण्यांना बोलावण्याची मुभा असताना लोकप्रतिनिधींनी लग्नाला शेकडोच्या संख्येने गर्दी झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. नेते मंडळी नियम सर्रास धाब्यावर बसवतात. मग नियम केवळ सर्वसामान्यांसाठीत आहेत का, असा सवालदेखील या सोहळ्यानंतर विचारला जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याpravin darekarप्रवीण दरेकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchandrakant patilचंद्रकांत पाटीलGopichand Padalkarगोपीचंद पडळकरBJPभाजपा