शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून आरक्षणाचा टक्का वाढवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 06:22 IST

आयोगाने केलेले विश्लेषण मान्य

मुंबई : मराठा समाजाला न्याय देणे, तसेच यापूर्वीच मागस प्रवर्गात समावेश केलेल्या मागास जातीस आरक्षणाच्या लाभापासून वंचित न करणे हा दुहेरी हेतून साध्य करण्यासाठी ५० टक्के आरक्षण मर्यादेचा पुनर्विचार होणे आवश्यक आहे, अशी स्पष्ट शिफारस मागासवर्ग आयोगाने केल्याने मराठा समाजाला सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक मागास प्रवर्गात १६ टक्के आरक्षण देऊन राज्यातील आरक्षणाचा टक्का ६२ पर्यंत वाढविण्यात आला आहे.

मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष् ट्या मागासलेला असल्याचे राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. आरक्षणाबाबत सांविधानिक तरतुदी पाहता एकूण लोकसंख्येच्या सुमारे ३० टक्के असणाऱ्या मराठा समाजास मागास दर्जा दिल्यानंतर जवळपास ८५ टक्के जनता मागास गणली जाणार आहे.

मराठा समाजाचा समावेश इतर मागास प्रवर्गात का केला नाही, याबाबतही आयोगाचे स्पष्टीकरण आहे. ५० टक्के आरक्षण मर्यादेचे उल्लंघन न करणे, तसेच उन्नत गटाबरोबर ठेवून असमान स्पर्धेस सामोरे जाण्यास प्रवृत्त करणे, या दोन्ही बाबींमुळे मराठा समाज पिडीत आहे. इतर मागासवर्ग यादीतील नागरिकांचा प्रवर्ग २९ टक्के आरक्षणाचा लाभ घेत आहे. या मागस प्रवर्गास त्यांच्या आरक्षणाचा लाभ लोकसंख्येच्या ३० टक्के प्रमाणात असणाºया मराठा समाजाबरोबर विभागून घेण्यास सांगितले तर मोठ्या वादविवादास निमंत्रण देणारे ठरेल, अशी भीती आयोगाने व्यक्त केली आहे.

आरक्षणाची मर्यादा ५० टक्के इतकीच ठेवल्यास त्यामधील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांचा कोटा वगळता उर्वरित २७ टक्के आरक्षणामध्ये सर्व मागासवर्ग गटांना समाविष्ट करणे म्हणजेच, उर्वरित ५० टक्के गटात अल्पसंख्यांक असणाºया उन्नत गटास प्राचीन काळापासून असलेल्या सामाजिक व शैक्षणिक प्रभुत्वास चालना देण्यासारखे होईल, असे आयोगाने म्हटले आहे.

मागास आयोगाच्या शिफारशीमाजी न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील मागासवर्ग आयोगाने मराठा समाज सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचा निर्वाळा दिला असून राज्यातील सेवांमध्ये या समाजाचे प्रतिनिधित्व अपर्याप्त असल्याचे म्हटले आहे. मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणून डॉ. एस.बी. निमसे, माजी सेवानिवृत्त अधिकारी सुधीर ठाकरे, डॉ. पी.जी. येवले, डॉ. सुवर्णा रावल, प्रा. सी. बी. देशपांडे, डॉ. डी.डी. बाळसराफ, प्रा. बी.व्ही. कर्डिले, आर.व्ही. जाधव, डॉ. आर. एन. करपे यांनी काम पाहिले, तर डी.डी. देशमुख हे सदस्य सचिव होते. यापैकी डॉ. डी.डी. बाळसराफ यांच्यासह अन्य चार सदस्यांनी आपली वेगळी भूमिका मांडणारे स्वतंत्र अहवाल दिले आहेत.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण