शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

...तर आता ‘लाडक्या बहिणी’ला निधी मिळणार नाही! अर्जांची  छाननी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 07:13 IST

लाडकी बहीण योजनेसंदर्भात अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. त्याआधारे आम्ही काही पावले उचलत आहोत. पात्र नसलेल्या महिलांनाही या योजनेचा लाभ मिळत आहे. त्यामुळे तक्रारी आलेल्या अर्जांची आम्ही छाननी करणार असल्याचे महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या आधी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची छाननी करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यासाठी प्राप्तीकर विभागाची (इन्कम टॅक्स) मदत घेतली जाणार आहे. अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल, तसेच कुटुंबात चारचाकी गाडी असेल तर अशा महिलांना आता योजनेचा लाभ मिळणार नाही. 

लाडकी बहीण योजनेसंदर्भात अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. त्याआधारे आम्ही काही पावले उचलत आहोत. पात्र नसलेल्या महिलांनाही या योजनेचा लाभ मिळत आहे. त्यामुळे तक्रारी आलेल्या अर्जांची आम्ही छाननी करणार असल्याचे महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.

अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांच्या आत असल्याची पडताळणी करण्यासाठी प्राप्तीकर विभागाकडून माहिती मागवणार आहोत. पॅन कार्डशीही उत्पन्नाची पडताळणी केली जाईल, असे अदिती तटकरे यांनी सांगितले, तसेच ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन असेल अशा महिलांनाही या योजनेतून वगळण्यात येणार आहे. त्यासाठी परिवहन विभागाकडूनही माहिती मागवली जाणार आहे.  इतर शासकीय योजनेचा लाभ मिळत असलेल्या लाभार्थी महिलांना वरच्या फरकाच्या रकमेचा लाभ दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाख असेल तरच लाभ- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख असणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल, अशी अट ही योजना घोषित करतानाच सरकारने टाकली होती. - मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्जांची पडताळणी न करता सरसकट अर्ज केलेल्या सर्व महिलांना लाभ दिला आहे.- या योजनेत लाभार्थी महिलांची संख्या अडीच कोटीच्या घरात आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीवर मोठा भार येत असल्याने अपात्र महिलांना वगळण्यासाठी सरकारने आता पावले उचलली आहेत. 

टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाState Governmentराज्य सरकारMONEYपैसा