शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
3
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
4
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
5
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
6
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
7
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
8
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
9
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
10
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
11
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
12
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
13
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
14
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
15
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
16
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
17
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
18
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
19
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
20
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?

...म्हणून एसटी कर्मचाऱ्यांसोबतच्या वाटाघाटी फिसकटल्या, तिढा सुटण्याऐवजी झाला अधिक गुंतागुंतीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 03:52 IST

वेतनाच्या मुद्द्यावरून एसटीत ‘न भूतो...’ असा संप सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर एसटी प्रशासनाने चर्चांचे सत्र सुरू केले. त्यानुसार बुधवारी तब्बल सहा तास झालेल्या या चर्चेत संपाबाबत निकाल अपेक्षित होता.

- महेश चेमटेमुंबई : वेतनाच्या मुद्द्यावरून एसटीत ‘न भूतो...’ असा संप सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर एसटी प्रशासनाने चर्चांचे सत्र सुरू केले. त्यानुसार बुधवारी तब्बल सहा तास झालेल्या या चर्चेत संपाबाबत निकाल अपेक्षित होता. मात्र, कोणत्याही ठोस निर्णयाविना बैठक संपली. प्रशासन आणि संघटना या दोघांनीही ताठर भूमिका घेतल्याने वाटाघाटी फिसकटल्या.बुधवारी सायंकाळी ७ वाजता एसटी प्रशासन आणि शिष्टमंडळ यांची चर्चेची फेरी सुरू झाली. सुरुवातीला प्रसारमाध्यमांमधील वृत्तांकनावर घमासन झाले. त्यामुळे सुरुवातीलाच वातावरण चांगलेच तापले. राज्यातील विविध आगारांमधील निषेध यात्रा, पुतळे जाळणे, या विषयांनाही या बैठकीत स्पर्श झाला. समाजमाध्यमांमध्ये ‘निगेटिव्ह’ प्रतिमा तयार होत असल्याचे प्रशासनाने सांगितले.‘आताच सातव्या वेतन आयोगाचा हट्ट का?’ असा सवाल एसटी प्रशासनाकडून विचारण्यात आला. मुळात राज्य सरकारची आर्थिक स्थिती नाजूक आहे. परिणामी, राज्य सरकारदेखील आयोग लागू करण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ‘राज्य सरकारला जेव्हा मिळेल, तेव्हा एसटी कर्मचाºयांना देऊ’, असे लिहून देण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.तथापि, लिखित देता येणे शक्य नसल्यामुळे सातवा वेतन आयोगाचा मुद्दा बाजूला राहिला. त्यानंतर चर्चेला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले आणि नंतर बैठक संपल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.प्रशासनाने देऊ केले अवघे १२०० कोटीशिष्टमंडळाने एसटी कर्मचाºयांसाठी ४,५०० कोटी रुपयांची मागणी केली. त्यानंतर २२०० कोटींपर्यंत खाली येण्याची तयारी शिष्टमंडळाने दर्शवली. मात्र, प्रशासनाने १२०० कोटीच देऊ, असे सांगितले. त्यामुळे चर्चेचा तिढा सुटण्याऐवजी अधिक गुंतागुंतीचा बनला. प्रशासनाने २.५७ गुणोत्तरानुसार वेतनवाढीचा प्रस्ताव शिष्टमंडळासमोर ठेवला. त्या वेळी यात त्रुटी असल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले. त्यानंतर शिष्टमंडळाने त्यांचा प्रस्ताव प्रशासनासमोर ठेवला. हा प्रस्ताव ३.५० गुणोत्तराचा प्रस्ताव होता.

टॅग्स :ST Strikeएसटी संपMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार