शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

..तर मुंबईच्या नाड्या बंद करू, मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 20:46 IST

Manoj Jarange Patil: राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्याची घोषणा केली आहे. मात्र सरकारने दगाफटका करण्याचा प्रयत्न केल्यास मुंबईकडे कूच करून मुंबई बंद करून टाकू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

.मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आठवडाभरापासून उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील यांनी आज अखेर आपलं उपोषण सोडलं आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्याची घोषणा केली आहे. मात्र सरकारने दगाफटका करण्याचा प्रयत्न केल्यास मुंबईकडे कूच करून मुंबई बंद करून टाकू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

जरांगे पाटील उपोषण सोडताना याबाबत म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला दोन महिन्यांची मुदत दिली आहे. आता जर  सरकारने दगाफटका केला, तर यांच्या पूर्ण नाड्या बंद करू. कोणत्या नाड्या बंद करायच्या तर आर्थिक आर्थिक नाडी बंद, सामाजिक, औद्योगिक, व्यावसायिक अशा सरकारच्या सगळ्या नाड्या बंद करू. चलो मुंबईची घोषणा करून मुंबई बंद करून टाकू.  असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दोन महिन्यांची म्हणजेच दोन जानेवारीपर्यंतची मुदत देत आहोत. ही सरकारला देण्यात येणारी शेवटची मुदत असेल. या मुदतीत आरक्षण मिळालं नाही तर मुंबईकडे कूच करू सरकारच्या नाड्या बंद करण्यात येतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.  

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMumbaiमुंबई