शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
2
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
3
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
4
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
5
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
6
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
7
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
8
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
9
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
10
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
11
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
12
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
13
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
14
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
15
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
16
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
17
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
18
अभिनेता आस्ताद काळेने लिव्ह-इन रिलेशनशीप अन् पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणाईला दिला 'हा' मोलाचा सल्ला
19
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
20
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला

...तर 23 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार करू- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 11:44 AM

मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी पवारसाहेबांनी दोन दिवसांपूर्वी सर्व विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांची बैठक घेतली होती.

नागपूरः मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी पवारसाहेबांनी दोन दिवसांपूर्वी सर्व विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांची बैठक घेतली होती. पवारसाहेबांनी सांगितलं की, नागपूरचं अधिवेशन संपेपर्यंत मुख्यमंत्री आणि त्यांच्याबरोबर सहा मंत्री काम करतील. नागपूरचं अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. 21 तारखेला अधिवेशन संपत आहे, 22 तारखेला सुट्टी आहे आणि 23 तारखेला मुख्यमंत्र्यांनी संमती दिली तर मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो, असं अजित पवार म्हणाले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी ते बोलत होते.अजित पवारांनी यावेळी नागरिकत्व सुधारणा कायद्यासंदर्भात मत व्यक्त केलं आहे. या कायद्याबद्दल दोन मतप्रवाह आहेत. काहींचं म्हणणं आहे केंद्रानं मंजुरी दिल्यानंतर राज्याच्या मंजुरीची गरज नाही. तर दुसरीकडे राज्याच्या मंजुरीची गरज असल्याचंही सांगितलं जात आहे. दोन दिवसांत नागपूरचं अधिवेशन संपेल. मुंबईला जाऊन ऍडव्होकेट जनरलकडून यासंदर्भात मार्गदर्शन घेऊ. हा कायदा लागू करण्यासंदर्भात माहिती पूर्ण घेतल्याशिवाय बोलणं योग्य ठरणार नसल्याचंही अजितदादांनी स्पष्ट केलं आहे.काल काँग्रेसचे प्रमुख नेते नागपुरात मुक्कामाला आलेले आहेत. मुख्यमंत्री आणि पवार साहेबांची भेट दुपारी ठरलेली आहे. भेट झाल्यानंतर पवारसाहेब औरंगाबादला जातील. पवारसाहेबांचा औरंगाबादला कार्यक्रम आहे. कर्जमाफीसंदर्भात काल बैठक होणार होती, पण ती काल होऊ शकली नाही. राज्याची आर्थिक परिस्थिती, उत्पन्नाचे स्रोत, जीएसटीचा हिस्सा या सगळ्या गोष्टी पाहूनच कर्जमाफी करावी लागणार असल्याचंही अजितदादा म्हणाले आहेत.   

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन