शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तर ‘समृद्धी’साठी कायद्यान्वये भूसंपादन

By admin | Updated: July 8, 2017 03:23 IST

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांनी थेट खरेदीने जमीन न दिल्यास भूसंपादन कायद्यान्वये ती ताब्यात घेऊन जाहीर केलेल्या

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांनी थेट खरेदीने जमीन न दिल्यास भूसंपादन कायद्यान्वये ती ताब्यात घेऊन जाहीर केलेल्या दरापेक्षा २५ टक्केकमी दर त्यासाठी आकारले जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी येथील जमिनीच्या थेट खरेदीसाठी जिल्हास्तरीय समितीने हेक्टरनिहाय दर जाहीर केले आहेत. त्यात बागायतीला दुप्पट दर जाहीर झाले आहेत.सर्वाधिक दर इगतपुरी तालुक्यातील पिंप्रीसद्रोद्दीन व सिन्नरच्या सावतामाळीनगरच्या जागेला मिळणार आहेत.  जिरायती, हंगामी बागायती व कायम बागायती असे वेगवेगळे दर आहेत. राज्यातील अन्य जिल्ह्यांनी समृद्धी महामार्गासाठी थेट खरेदी करावयाच्या जमिनींचे दर जाहीर करून पुढील कार्यवाही सुरू केली असताना नाशिकला मात्र दर जाहीर करण्यासाठी विलंब झाला. सिन्नर तालुक्यातील २५, तर इगतपुरी तालुक्यातील २३ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण झाली असून, पाथरे, शिवडे, मऱ्हळ, डुबेरे, वारेगाव व घोरवड या सहा गावांमधील शेतकऱ्यांनी महामार्गाला तीव्र विरोध केल्यामुळे तेथील जमिनींची मोजणी करण्यात आलेली नाही.प्रशासनाने या गावांमध्ये गेल्या तीन वर्षांत झालेल्या व्यवहारांची माहिती गोळा करून त्या आधारे दर निश्चिती केली आहे. जिरायती जमिनींचे रेडीरेकनरचे दर व त्यावर जिल्हा समितीने ठरविलेल्या दराच्या पाच पट दर दिला आहे.  हंगामी बागायती जमिनीसाठी दीडपट व कायम बागायतीसाठी जिरायती जमिनीच्या दुप्पट दर दिला जाणार आहे.  जमिनीत फळझाडे, विहीर, घर, गोठे, पाइपलाइन यासारखी मालमत्ता असल्यास त्याचे मूल्यांकन केले जाईल. त्यासाठी वेगळा दर असेल. इगतपुरी, सिन्नरला सर्वाधिक भावसिन्नर तालुक्यातील सावतामाळीनगर येथील जमिनीला हेक्टरी ८४ लाख ७१ हजार ८२० इतका,  सायाळे येथील जमिनीला ४० लाख ९९ हजार ६९५ इतका कमी दर जाहीर झाला आहे. इगतपुरी तालुक्यातील पिंप्रीसद्रोद्दीन येथे सर्वाधिक ८४ लाख ८६ हजार १७०, तर सर्वाधिक कमी ४३ लाख २० हजार २९० दर अवचितवाडी या गावासाठी जाहीर करण्यात आला.४८ तासांत खात्यावर पैसेशेतकऱ्यांनी थेट खरेदीने जमिनी रस्ते विकास महामंडळाला दिल्यास अवघ्या ४८ तासांत त्यांच्या खात्यावर पैसे वर्ग केले जातील, असेही जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन, महेश पाटील, विठ्ठल सोनवणे यांच्या समितीने जाहीर केले.रस्ता तर होणारचहा महामार्ग कोणत्याही परिस्थितीत होईलच, असे समितीने ठासून सांगितले. जमिनी न देणाऱ्या शेतकऱ्यांच्या जागेवरून उड्डाणपूल करणे शक्य नसल्याने जमिनी तर घ्याव्याच लागतील, अशी भूमिका समितीने जाहीर केली.