शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

राज्यभरात आतापर्यंत १२३ कोटी ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 06:33 IST

निवडणूक आयोगाची माहिती; ४६ कोटी ६२ लाखांची रोकड, ३ कोटी लिटर दारू हस्तगत

मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत पोलीस, आयकर विभाग, अबकारी कर विभागाने केलेल्या कारवाईत आतापर्यंत १२३ कोटी ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात रोख रक्कम, मद्य, मादक पदार्थ, सोने-चांदी आदींचा समावेश असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी सोमवारी दिली.शिंदे म्हणाले की, विविध विभागांकडून केलेल्या कारवाईमध्ये ४६ कोटी ६२ लाखांची रोकड, २३ कोटी ९६ लाखांची (तब्बल ३ कोटी ८ लाख ७९३ लिटर) दारु, ७ कोटी ६१ लाखांचे मादक पदार्थ, ४५ कोटी ४७ लाखांचे सोने, चांदी असे एकूण १२३कोटी ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर, आचारसंहिता भंग व निवडणूक प्रक्रियेशी निगडीत २२ हजार ७९५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये पोलीस विभाग आणि उत्पादन शुल्क विभागाकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा समावेश आहे. लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार ७६ गुन्हे, अनधिकृतरित्या दारू बाळगणे, विक्री, वाटपासाठी दारूची वाहतूक अशा स्वरुपाचे १४ हजार ५८३ गुन्हे, बेकायदेशीररित्या शस्त्र निर्मिती, विक्री, त्याचे प्रदर्शन, शस्त्र जवळ बाळगणे आदींबाबत ७४७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.नशेचे पदार्थ (नारकोटिक्स ड्रग्ज) बाळगल्याबाबतचे १२६, स्फोटक पदार्थ कायद्यांतर्गत १२ गुन्हे, अन्न व औषध अधिनियमांतर्गत ६०, महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत मालमत्तेचे विद्रुपीकरण अंतर्गत ६६ आणि इतर २८ गुन्ह्यांचा समावेश आहे.४० हजार ३३७ शस्त्रे जमाआचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत शस्त्र परवानाधारकांकडून ४० हजार ३३७ शस्त्रे जमा करून घेण्यात आली आहेत. सूचना देऊनही जमा न केलेली ३० शस्त्रे जप्त करण्यात आली असून १३५ शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. याशिवाय १ हजार ५७१ विनापरवाना शस्त्रे, ५६६ काडतुसे आणि १८ हजार ५१३ जिलेटीन आदी स्वरूपाचे स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.‘सी-व्हिजिल’वर ३ हजार ५६१ तक्रारीसी-व्हिजिल अ‍ॅपवर आतापर्यंत ३ हजार ५६१ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी २ हजार ३४ तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले असून, त्यामध्ये जिल्हा स्तरावर योग्य ती कारवाई करण्यात आली आहे.या अ‍ॅपवर अनधिकृत दारू, मतदारांना आमिष म्हणून दारुचे वाटप, पैशाचा वापर, विनापरवानगी पोस्टर लावणे, मालमत्तेचे विद्रुपीकरण अशा स्वरुपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019