शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

...तर खासगी वाहिन्यांद्वारे ई लर्निंगला परवानगी द्यावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 06:15 IST

शिक्षणमंत्र्यांची मागणी : दूरदर्शनची वेळ उपलब्ध न झाल्यास पर्यायी व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना दूरदर्शन आणि आकाशवाणीवरून शिक्षणाचे धडे देण्याचा शिक्षण विभागाचा मानस आहे. त्यासाठी त्यांनी दूरदर्शनचे १२ तास, तर आकाशवाणीच्या दोन तासांचा वेळ देण्याची मागणी केंद्राच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे. ती उपलब्ध न झाल्यास खासगी वाहिन्यांद्वारे ई लर्निंग अभ्यासक्रम शिकविण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडे केली.

आगामी शैक्षणिक वर्षाच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड यांनी अजोय मेहता यांची भेट घेऊन ई लर्निंग,शाळा नियोजनातील सुरक्षितता, आॅनलाइन व आॅफलाइन शाळा सुरू करणे अशा विविध मुद्द्यांवर सोमवारी चर्चा केली.दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिन्यांवरून प्रसारण केल्यास गाव-खेड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येईल. स्थलांतरित विद्यार्थ्यांनाही असतील त्या ठिकाणावरून हे अधिक सोयीचे ठरू शकेल.

ऑनलाइन वर्ग घेण्यासाठी स्मार्टफोन किंवा विशिष्ट प्रणाली, चांगली इंटरनेट सुविधाही लागते. ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थीगरीब घरातून येतात. त्यामुळे त्यांच्यासाठी हे अशक्य आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे शिक्षण कोणताही खंड न पडता सुरू राहावे, असा शिक्षण विभागाचा प्रयत्न असल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून गायकवाड यांनी खासगी चॅनेलद्वारे शिक्षणाला परवानगी मागितली.राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील सीईओ, जिल्हा शिक्षणाधिकारी, मनपा आयुक्त यांच्या माध्यमातून प्रत्येक गावात मोबाइल कनेक्टिव्हिटी, अ‍ॅण्ड्रॉईड फोन, टॅब उपलब्ध करून देण्याबाबतही विचार केल्यास अधिक चांगल्या स्तरावर ई लर्निंगचे नियोजन करण्यास मदत होईल, असे चर्चेदरम्यान शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.कोरोना प्रतिबंधात्मक समिती हवीभविष्यात शाळा सुरू करण्याबाबतही (आॅनलाइन/ आॅफलाइन ) जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून शाळांची स्वच्छता, निर्जंतुकीकरण, सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझर उपलब्ध करून देणे यांसारख्या बाबींची चर्चा कोरोना प्रतिबंधात्मक समितींशी करून प्रत्यक्ष अंमलबजावणी करायला हवी. सोबतच तशा सूचना त्यांना द्यायला हव्यात, असे मत चर्चेदरम्यान शिक्षणमंत्र्यांनी मांडले.

टॅग्स :Educationशिक्षण