शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

"औरंगाबादच्या नामांतराचा विषय केवळ राजकारणासाठी वापरता, असं समजायचं का?", रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 17:28 IST

मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटमध्ये छत्रपती संभाजीनगर ऐवजी औरंगाबाद उल्लेख करण्यात आला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुंबई : राज्यातील वक्फ मालमत्तांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी एक वेबपोर्टल सुरु करण्यात आले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट करत माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटमध्ये छत्रपती संभाजीनगर ऐवजी औरंगाबाद उल्लेख करण्यात आला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करत औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर केल्याचा विसर पडलेला दिसतोय, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना म्हटले आहे. रोहित पवार म्हणाले, "मुख्यमंत्री महोदय आजच्या जाहिरातीत शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या फोटोचा जसा आपल्या पक्षाला विसर पडला तसाच औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर केल्याचाही विसर पडलेला दिसतोय... आणि विसर पडला नसेल तर नामांतराचा विषय तुम्ही सुद्धा केवळ राजकारणासाठी वापरता, असं समजायचं का? विरोधी पक्षाकडून अशी चूक झाली असती तर सरकारकडून त्याचं राजकारण झालं असतं. मला राजकारण करायची नाही, पण आपल्या कार्यालयाकडून झालेली चूक निदर्शनास आणून द्यायचीय.. ती आपण दुरुस्त कराल, ही अपेक्षा!"

मुख्यमंत्री कार्यालयाने सीएमओ महाराष्ट्र अकाउंटवरून ट्विट केले आहे. यात म्हटले आहे की, "मुख्यमंत्री @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते वक्फ मालमत्तांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या वेबपोर्टलचा आज शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे कार्यालय औरंगाबादला असून राज्यातील वक्फ मालमत्तांशी संबंधित प्रकरणांच्या कामकाजाच्या अनुषंगाने औरंगाबाद येथे जावे लागते. ही अडचण दूर करून  वक्फ मालमत्तांशी संबंधित कामकाज ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा निर्माण व्हावी, या हेतूने  https://mahawaqf.maharashtra.gov.in हे वेब पोर्टल विकसित केले आहे. आता ऑनलाईन नोंदणीची सुविधा या संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहे."

दरम्यान, राज्यातील काही वृत्तपत्रांमध्ये आज छापून आलेल्या शिवसेनेच्या एका जाहिरातीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या जाहिरातीत देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे असा उल्लेख करण्यात आला आहे. आतापर्यंत देशात नरेंद्र-महाराष्ट्रात देवेंद्र अशी घोषण होत होती. आता मात्र देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात होत आहे. या जाहिरातीमुळे राज्यात आता चर्चांना उधाण आले आहे. या जाहिरातीवरून सुद्धा रोहित पवार यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर टीका केली आहे. "शिंदे गटाची शिवसेना स्वतःला प्रमोट करत आहे, गेल्या दहा दिवसापासून भाजप आणि शिंदे गटात वाद सुरू झाला आहे.तर काही नेत्यांना मंत्रिपदावरून काढावं, असा वाद सुरू झाला आहे.तर शिंदे गट मोठा पक्ष म्हणून प्रस्थापित झाला आहे आणि भाजप महत्वाची नाही असं दाखवून देण्याचा हा प्रयत्न आहे. अशा परिस्थितीमध्ये शिंदे गटाला भाजपचे नाहीतर भाजपला शिंदे करायची गरज आहे", असे रोहित पवार म्हणाले.

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे