शहरं
Join us  
Trending Stories
1
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
2
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
3
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
4
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
5
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
6
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
7
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
8
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
9
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
10
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
11
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
12
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
13
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
14
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
15
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
16
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
17
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
18
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
19
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
20
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे

‘एसएनडीटी’च्या विद्यार्थिनी निवडणार ‘स्वदिशा’

By admin | Updated: March 23, 2017 03:16 IST

गेल्या काही वर्षांत व्यवसाय, नोकरी क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे येणाऱ्या नवनवीन व्यवसायांची भाषा

मुंबई: गेल्या काही वर्षांत व्यवसाय, नोकरी क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे येणाऱ्या नवनवीन व्यवसायांची भाषा, स्वरूप बदले आहे, पण अभ्यासक्रमात व्यवसायाभिमुख बदल झालेले नाहीत. त्यामुळे पदवी घेतल्यावर नोकरीसाठी बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक समस्या असते. विद्यार्थ्यांना पदवी घेतल्यावर नोकरीसाठी वणवण करावी लागू नये, म्हणून राज्यात पहिल्यांदाच मुंबईच्या एसएनडीटी विद्यापीठाच्या विद्यार्थिनींसाठी प्रायोगिक तत्त्वावर ‘स्वदिशा’ प्रकल्प हाती घेतला आहे. युनायटेड नेशन डेव्हलमेंट प्रोग्राम, महाराष्ट्र राज्य सरकार, तलरंग, सीसीआय आणि व्हीबॉक्स यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात ‘स्वदिशा’ हा कार्यक्रम २ मार्च रोजी सुरू करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी देशभरात सुरू असलेल्या ‘दिशा’ या कार्यक्रमांतर्गत राज्यात ‘स्वदिशा’ हा प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले आहे. हा प्रकल्प एका वर्षासाठी हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पात पहिल्या पातळीवर एसएनडीटी विद्यापीठातील १५ हजार विद्यार्थिनींना त्यांच्या आवडीची नोकरी मिळावी, म्हणून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ८ मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले होते. यानंतर, २१ मार्चपासून पाच दिवसीय शिक्षकांसाठी प्रशिक्षण ठेवण्यात आल्याची माहिती तलरंगच्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्वेता रैना यांनी ‘लोकमत’ला दिली.श्वेता रैना यांनी पुढे सांगितले, गेल्या काही वर्षांत व्यवसायात झालेल्या बदलांचा विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातून अंदाज येत नाही. त्यामुळे पदवी हातात असतानाही विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे या विद्यापीठातील विद्यार्थिनींसाठी नोकरी मिळवून देण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पात सुरुवातीला विद्यार्थिनींची ‘सायकोमेट्रिक्स टेस्ट’ घेतली जाणार आहे. यामधून विद्यार्थिनींच्या आवडी-निवडींचा अंदाज येईल. यानंतरच्या पातळीवर तलरंगतर्फे त्यांचे मेंटॉरिंग केले जाणार आहे. विद्यार्थिनींशी चर्चा करून, त्यांच्यासमोर असलेल्या नोकरीच्या पर्यायांची त्यांना ओळख करून दिली जाणार आहे. याच्या पुढच्या टप्प्यात सीसीआयकडे हा अहवाल सादर होईल. यानंतर सीसीआयमार्फत या विद्यार्थिनींना नोकरी उपलब्ध करून दिली जाणार आहे. एका वर्षानंतर हा प्रकल्प पुढे सातत्याने चालू राहावा, म्हणून या प्रकल्पात प्राध्यापकांनाही सहभागी करून घेण्यात आले आहे. प्राध्यापकांना आताच्या मुलांची विचारसरणी कशी आहे, त्यांना हव्या असणाऱ्या नोकऱ्या कशा आहेत, त्या मिळवण्यासाठी त्यांनी काय करणे आवश्यक आहे, याविषयी ५ दिवसीय प्रशिक्षणात माहिती दिली जाणार आहे. या विद्यार्थ्यांशी कसा संवाद साधायचा, त्यांना करिअरची नवी दारे कशी खुली करून द्यायची, याविषयी ही विशेष माहिती दिली जाणार आहे. या सर्वातून एक प्रक्रिया सुरू करणार असल्याचे श्वेता यांनी सांगितले.