शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 12:39 IST

Swiss Bank: वर्ष २०२४ मध्ये स्विस बँकांमधील भारतीयांचा पैसा तिप्पट वाढल्याचा अहवाल समोर आला.

नवी दिल्ली/झुरिक : वर्ष २०२४ मध्ये स्विस बँकांमधील भारतीयांचा पैसा तिप्पट वाढून ३.५ अब्ज स्वीस फ्रँक (३७,६०० कोटी रुपये) झाला. स्वित्झर्लंडच्या केंद्रीय बँकेने गुरुवारी जारी केलेल्या वार्षिक आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. स्थानिक शाखा आणि अन्य वित्तीय संस्थांमध्ये ठेवण्यात आलेल्या पैशांत मोठी वाढ झाल्यामुळे हा आकडा वाढला असल्याचे केंद्रीय बँकेने म्हटले आहे.

स्विस नॅशनल बँकेने (एसएनबी) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये स्विस बँकांत भारतीय ग्राहक खात्यांतील पैसा मात्र केवळ ११ टक्के वाढून ३४६ दशलक्ष स्विस फ्रँक (सुमारे ३,६७५ कोटी रुपये) झाली. एकूण ठेवींच्या तुलनेत हा आकडा एक दशांश एवढाच आहे. आदल्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये स्विस बँकांतील भारतीयांचा पैसा ७० टक्के घसरून केवळ १.०४ अब्ज स्विस फ्रँक एवढाच राहिला होता. हा ४ वर्षांचा नीचांक होता.

२०२१ मध्ये भारतीयांचे ३.८३ अब्ज स्विस फ्रँक स्वीस बँकांत होते. हा १४ वर्षांचा उच्चांक ठरला होता. त्यानंतरचा सर्वाधिक पैसा २०२४ मध्ये भारतातून स्विस बँकांत गेला आहे. सूत्रांनी सांगितले की, स्विस नॅशनल बँकेने जारी केलेले हे अधिकृत आकडे असून ते कथित काळ्या पैशाचे प्रतिनिधित्व करीत नाहीत, तसेच भारतीयांनी, अनिवासी भारतीयांनी वा अन्य व्यक्तींनी स्विस बँकांत तिसऱ्या देशांतील संस्थांच्या नावे ठेवलेल्या पैशांचाही संकेत त्यातून होत नाही.

अहवालात अजून काय?‘एसएनबी’ने २०२३ च्या अखेरीस स्विस बँकांची एकूण देयता असलेली रक्कम ३५४.५५ कोटी स्विस फ्रँक इतकी होती.  यात ग्राहक ठेवींद्वारे ठेवलेले ३४.६ कोटी स्विस फ्रँक, अन्य बँकांच्या माध्यमातून ठेवलेले ३.०२ अब्ज स्विस फ्रँक, ट्रस्टच्या माध्यमातून ठेवलेले ४.१ कोटी स्विस फ्रँक आणि रोखे, समभाग आणि अन्य वित्तीय उत्पादनांच्या स्वरूपात १३.५ कोटी स्विस फ्रँक यांचा समावेश आहे.

टॅग्स :Swiss Bankस्विस बँकInternationalआंतरराष्ट्रीय